नक्षलवाद्यांनी माजी पंचायत समितीच्या सभापतीला निर्दयीपणे संपवलं; मुख्यमंत्र्याकडून दखल, म्हणाले
Marathi February 02, 2025 06:24 PM

गॅचिरोली बातम्या: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोक वर काढत एका माजी पंचायत समितीच्या सभापतीची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (वय 46) यांची शनिवारी रात्री क्रूरपणे हत्या केली आहे. घरातून उचलून गावालगत असणाऱ्या मैदानावर त्यांची हत्या (Gadchiroli Crime) केल्याचे उघड झाल्याने सर्वत्र एकच मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी सातत्याने नक्षलवाद्यांच्या मुसक्या आवळल्याने सूडाच्या भावनेने आणि मागील काही दिवसांपासून शांत बसलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या प्रकरणाची दखल राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी घेतली असून ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांच्यावर महिनाभरात कारवाई होईल. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

गडचिरोलीमध्ये माओवादी निराश, महिनाभरात कारवाई- देवेंद्र फडणवीस

गडचिरोलीमध्ये माओवादी निराश झाले आहेत. म्हणून ते सातत्याने सरेंडर करत आहेत. जे सरेंडर करत नाहीत ते निष्क्रिय होत आहेत. दरम्यान शेवटचा घटकापर्यंतचा माओवाद आम्ही पुसतोय. त्यामुळे माओवादी निराश होताय आणि त्या निराशेतून केलेली ही हत्या दिसते आहे. मात्र ज्यांनी हे केलंय त्यांच्यावर महिनाभरात कारवाई होईल. असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

नक्षलवाद्यांनी घरात घुसूत फरफटत बाहेर नेलं अन्  निर्दयीपणे संपवलं

गडचिरोलीच्या भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (46) यांची नक्षलवाद्यांनी शनिवारी रात्री हत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांना घरातून उचलून नेत गावाला लगत असलेल्या मैदानावर त्यांची हत्या करण्यात आली. मागील काही दिवसांपासून शांत बसलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा माजी सभापतीची हत्या करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान यावेळी मृतदेहाजवळ पत्रक देखील आढळून आले असून या घटनेचा तपास आता पोलीस करीत आहे. शनिवारी( 1जानेवारी) रात्री नक्षलवाद्यांनी मडावी यांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने उचलून नेले आणि गावालगतच्या मैदानावर निर्घृण हत्या केली. घटनास्थळी पत्रक फेकून त्यांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी हालचाली कमी झाल्या होत्या, मात्र या हत्येने नक्षलवादी पुन्हा सक्रिय होत असल्याची गावात चर्चा आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.