बीडमधील मयत सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंब महंत नामदेवशास्त्री महाराज यांची भेट घेणार आहे. यासाठी ते भगवान गडाकडे शिष्टमंडळासह रवाना झाले आहेत. महंत नामदेवशास्त्री महाराज यांच्याकडे न्यायाची मागणी करणार आहे. या भेटीत काय होते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Nagpur : ऐतिहासिक शिवकालीन वाघनखं नागपूरमध्ये दाखल Nagpurऐतिहासिक शिवकालीन वाघनखं नागपूरकडे रवाना झाली आहेत. लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून 19 जुलै 2024 भारतात आणलेली ही अमूल्य ऐतिहासिक वाघनखं साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली होती. आतापर्यंत 4 लाख 30 हजारांहून अधिक शिवप्रेमींनी वाघनखांचे दर्शन घेतले.
Sonia Gandhi : सोनिया गांधी राष्ट्रपतींवर केलेल्या विधानांवरून अडचणीत; तक्रार दाखलसंसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी केलेल्या विधानामुळे अडचणीत आल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल ‘Poor Lady’, असे विधान केल्यामुळे सोनिया गांधी यांच्याविरुद्ध बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातील न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Election : भंडारा जिल्हा परिषदेची सभापतीपदासाठी निवडणूक 7 फेब्रुवारीलाभंडारा येथील जिल्हा परिषदेतील विषय समितींच्या सभापतीपदासाठी येत्या 7 फेब्रुवारीला निवडणूक होण्याची शक्यता आहे. चार सभापती पदांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली आहे. दोघांकडूनही सभापतीपदे मिळविण्यासाठी तयारी सुरू झाल्याचे दिसते.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, तिथं हदगावमधील श्रीकृष्ण देव उखळाई मंदिराचे नवपर्व आणि कलशारोहण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्यासह इतर राज्यातून लाखो भाविक उपस्थित झाले आहेत.
Sanjay Raut Live: बजेटमध्ये बिहारच्या तुलनेत महाराष्ट्राला काहीही मिळालं नाहीएकनाथ शिंदेंच्या आमदारांमध्ये चलबिचल सुरु आहे, त्यांच्यात विसंवाद वाढत आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलं. शनिवारी सादर झालेले बजेट हे जनतेला मधाचं बोट लावण्याचा प्रकार आहे. निवडणुका समोर ठेवून मोदी सरकारने बजेट सादर केले आहे, बिहारच्या तुलनेत महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना बजेट समजायला 72 तास लागतात, असा टोला राऊतांनी लगावला.
Nashik-Gujarat-Highway-Accident:नाशिक येथे देवदर्शन करुन परत गुजरातला जात होते...नाशिक-गुजरात हायवेवर खासगी बसचा आज आज पहाटे अपघात झाला. यात सात जणांना मृत्यू झाला आहे. सुमारे 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृत्यू झालेले आणि जखमी व्यक्ती हे गुजरातचे रहिवासी आहेत. ते नाशिक येथे देवदर्शन करुन परत गुजरातला जात होते. खासगी बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. अपघातात इतका भीषण होता. ती बसचे दोन तुकडे झाले.
Beed live News: बीड जिल्ह्यात मोठी कारवाई 183 शस्त्र परवाने रद्दसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहेत. बीड जिल्ह्यात 183 शस्त्र परभणीच्या प्रशासनाने रद्द केले आहेत. आणखी 127 रद्द होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये 8 जणांनी स्वतः सरेंडर होत आपली शस्त्रे जमा केली आहेत . श्रीमंती आणि वर्चस्व दाखवण्याची हाऊस जपणाऱ्या बीडच्या शस्त्र परवानाधारकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे .
Hemant Patil : अशोक चव्हाण म्हणजे भाजप नव्हे - हेमंत पाटीलआगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप स्वबळावर लढवण्याचे संकेत भाजप नेते अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता शिवसेना नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांचे स्वबळ असेल तर आमचे पण आहे आणि अशोक चव्हाण म्हणजे भाजप नव्हे, अशी टीका आमदार हेमंत पाटील यांनी केली आहे.
Beed News : बीड जिल्ह्यात 183 शस्त्र परवाने रद्दसरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड पोलिस प्रशासन अॅक्शन मोडवर आलं आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 183 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यात नोंदणीकृत 1281 शस्त्र परवाने आहेत. त्यात 310 प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्याकी 183 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. तर आणखी 127 रद्द होणार आहेत.
Chandrakant Mokate : माजी आमदार चंद्रकांत मोकाटे ठाकरेंची साथ सोडणार?शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे कोथरुडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मोकाटे लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
Mahant Namdev Shastri : मस्साजोगचे ग्रामस्थ आज भगवान गडावर जाणारमहंत नामदेव शास्त्रींनी आपण मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. अशातच आता त्यांना हत्या प्रकरणातील दुसरी बाजू माहिती नसल्यामुळे त्यांनी पाठिंबा जाहीर केला असावा, असंही बोललं जात आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आज मस्साजोगचे ग्रामस्थ नामदेव शास्त्री यांची भेट घेण्यासाठी भगवान गडावर जाणार असून यावेळी ते या प्रकरणातील महत्वाचे पुरावे देखील दाखवणार असल्याचं सांगितलं जात आहे.