Maharashtra Live Update : राज्यभरातील शासकीय ठेकेदार जाणार संपावर
Saam TV February 02, 2025 08:45 PM
सर्व सर्वांचे धन्यवाद! चितळे बंधूंना 75 वर्षे झाल्याबद्दल आम्ही कृतज्ञता सोहळा ठेवला - केदार चितळे

आमची इंनिंग अशीच सुरु राहील अशी अपेक्षा आहे.

आमचे वेगळे वेगळे प्रयोग सुरु आहेत..

भाकरवडी ला पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होतं आहेत.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया युके अशा वेगवेगळ्या देशांमध्ये आम्ही आउटलेट सुरु केली आहेत...

परदेशात घरी जे पदार्थ करणे शक्य नाहीये ते सगळे पदार्थ परदेशात पाठवण्याचा आमचा प्रयत्न आहे...

Maharashtra Live Update : राज्यभरातील शासकीय ठेकेदार जाणार संपावर

राज्यभरातील शासकीय ठेकेदार जाणार संपावर

14 फेब्रुवारी पासून राज्यातले सर्व ठेकेदार काम बंद आंदोलन करून करणार संप

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अंदाजे 16000 कोटी रुपयांची देयके प्रलंबित

त्यामुळे ठेकेदार देशोधडीला लागण्याची वेळ

लोकप्रतिनिधींनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कामे मंजूर करून आणलीत

लंमात्र त्या बदल्यात मिळणारे पैसे अद्यापही वर्ग न झाल्याने ठेकेदार आंदोलनाच्या पवित्रात

राज्य सरकारने ठेकेदारांचे सर्व पैसे त्वरित अदा करावे अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा दिला इशारा

Beed : देशमुख कुटुंबीय भगवान गडावर दाखल...

देशमुख कुटुंबीय भगवान गडावर दाखल...

संत भगवाबाबा समाधी मंदिरात घेणार दर्शन..

दर्शनानंतर महंत नामदेव शास्त्री महाराज यांची देशमुख कुटुंबीय घेणार भेट..

देशमुख कुटुंब आणि नामदेव शास्त्री यांच्या भेटीदरम्यान काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष..

Pandharpur: विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

या पंढरपुरात.. बाई वाजत गाजतं..., सोन्याचं बाशिंग, लगीन देवाचं लागलं... या पारंपारिक लोकगीतावर ठेका धरत आज शेकडो महिला व भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचा याची देही याची डोळा आनंद लुटला.

यावेळी देव ब्राम्हणांच्या साक्षीने व सात मंगलाष्टकांनी देवाचा विवाह लावण्यात आला.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज विठु रुखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या थाटामोठात आणि तितक्याच भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात विविध प्रकारच्या आकर्षक फुलांची साजवट करण्यात आली होती.

देवाच्या विवाह सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.

Hingoli: सुसाट वेगाने धावणाऱ्या ऑटो रिक्षामधून मुली कोसळल्याचे प्रकरण, चालकाविरोधात गुन्हा दाखल

हिंगोली ते सेनगाव राज्य महामार्गावर सुसाट वेगाने धावणाऱ्या एका रिक्षा मधून तीन शाळकरी विद्यार्थिनी कोसळल्याची घटना घडली होती.

या घटनेत एका 17 वर्षीय मुलीचा मृत्यू देखील झाला होता तर दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या होत्या.

याप्रकरणी आता हिंगोली ग्रामीण पोलिसांनी रिक्षा चालक असलेला आरोपी रोहित श्रीवास याच्या विरोधात वाहन निष्काळजीपणाने चालवून प्रवाश्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान हिंगोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची लिंक मिळत नसल्याने लाभार्थी प्रतीक्षेत

निवडणुकीच्या आचारसंहितापासून बंद असलेली संकेतस्थळ अद्यापही बंद.....

21 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांना योजनेच्या फॉर्म भरताना अडचणी....

संकेतस्थळ कधी सुरू होईल याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष....

Sachin kharat: मंत्री धनंजय मुंडे यांना संतपदी पोहचवलं कसं उत्तर द्या - सचिन खरात

मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगडावर जाऊन नामदेव शात्री यांची भेट घेतली.

त्यावेळी पत्रकार परिषद मध्ये नामदेव शात्री म्हणाले आमच्या क्षेत्रात एवढा त्रास झाला असता तर धनंजय मुंडे संत झाले असते.

मुळात भगवानगडाची उभारणी सर्व जाती धर्मात एकोपा ठेवण्यासाठी झाली आणि भगवानगड सर्व जातीधर्माचे प्रतीक आहे.

वाल्मीक कराड हे खंडणी प्रकरणातील आरोपी आहेत आणि वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे सहकारी आहेत.

सरपंच संतोष देशमुख याची जी हत्या झाली निर्गुणपणे हत्या झाली ती हत्या एका दलित मुलाला वाचवण्यासाठी गेल्यामुळे झाली आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

परंतु वाल्मिक कराड नुसते सहकारी नाही तर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक सर्व क्षेत्रात त्यांचे निकटचे संबंध आहेत.

त्याचमुळे सरपंच संतोष देशमुख तपासात कोणताही दबाव येऊ नये म्हणून आम्ही सर्व राजीनामा मागत आहोत, तरीपण आपण मंत्री धनंजय मुंडे यांना संतपदी पोहचवलं उत्तर द्या...

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नांदेडच्या हदगावमध्ये आगमन.

श्रीकृष्ण देवउखलाई मंदिराचे नवपर्व आणि कलशारोहन सोहळ्याला राहणार उपस्थित

Amshya Padvi : ठेकेदार आणि इंजिनीयर यांच्यात पार्टनरशिप असल्याचे आमदार आमश्या पाडवी यांचे गंभीर आरोप

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या गोरंबा येथे निगधी ते लेगापाणी रस्त्याचे काम पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत सुरू असून कामाच्या ठिकाणी अक्कलकुवा धडगाव मतदार संघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी अचानक भेट दिल्या नंतर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे समोर आले आहे.

यावेळी आमदार आमश्या पाडवी ठेकेदारावर चांगलेच संतापले होते, ठेकेदाराला रस्ता दर्जेदार बनवण्याची सूचना दिली असून धडगाव अक्कलकुवा तालुक्यात सुरू असलेल्या कामांची चौकशीची मागणी आमदार पाडवी यांनी केली आहे.

तसेच या परिसरात ठेकेदार आणि इंजिनियर यांची पार्टनरशिप राहत असल्याचे गंभीर आरोप देखील आमदार आमश्या पाडवी यांनी केले आहे.

Pandharpur: विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी भाविकांची तुडूंब गर्दी

विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी हजारो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत.

मंदिरातील विठ्ठल सभागृहासह मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरला आहे.

थोड्याच वेळात देवाचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.

विवाह सोहळ्याचे साक्षिदार होण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.

पश्चिम द्वार, महाद्वार, उत्तर द्वार यासह मंदिर परिसरात तुडुंब गर्दी झाली आहे.

भाविकांना विवाह सोहळा पाहता यावा यासाठी मंदिर समितीने एलएडीची सोय केली आहे.

Dhananjay Deshmukh: धनंजय देशमुख बीडहून भगवान गडाकडे रवाना

महंत नामदेव शास्त्री महाराज यांची देशमुख कुटुंबीय घेणार भेट..

भेटीच्या पार्श्वभूमीवर भगवानगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात ..

मात्र खाजगी कार्यक्रमासाठी महंत नामदेव शास्त्री गेले असल्याची माहिती...

देशमुख कुटुंब आणि नामदेव शास्त्री यांच्या भेटीदरम्यान काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष..

Hemant Patil: अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही - हेमंत पाटील

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवण्याचे संकेत माजी मुख्यमंत्री भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिले होते.

त्यावर शिवसेनेने अशोक चव्हाण यांना प्रतिउत्तर दिले आहे. त्यांची स्वबळाची तयारी असेल तर आमची पण स्वबळाची तयारी आहे. अशोक चव्हाण म्हणजे भाजप नाही अशोक चव्हाण भाजपमध्ये नवीन आहे.

त्यांना युती धर्माची माहिती खूप कमी आहे युती धर्म म्हणून आम्ही भाजप सोबत काम केले आहे. भाजपच्या जुन्या मंडळी सोबत हातात हात घालून आम्ही काम केल्याचे हेमंत पाटील म्हणाले.

Satara: छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील शिवकालीन वाघनखे घेऊन कंटेनर नागपूरच्या दिशेने रवाना

मागील वर्षी 19जुलै रोजी लंडन येथील व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातून आणल्यानंतर ही शिवकालीन वाघनखे राज्य सरकारने राजधानी साताऱ्यात ठेवण्याचा पहिला बहुमान दिला होता

मागील सात महिन्यात 4 लाख 30 हजाराहून अधिक शिवप्रेमींनी शिवकालीन वाघनखे पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला दिली भेट

यापुढील काळात नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन वाघनखे शिवप्रेमींना पाहण्यासाठी होणार उपलब्ध

जागतिक पाणथळ दिनानिमित्त डीपीएस लेक बचावासाठी शांतता मानवी साखळी आंदोलन

जागतिक पाणथळ दिनानिमित्त नेरुळ मध्ये पर्यावरण प्रेमींकडून शांतता मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.

सिडको तर्फे डीपीएस लेक मधील पाण्याचा प्रवाह थांबविण्यात आला असून फ्लेमिंगोचा अधिवास नष्ट करण्याचे कारस्थान सिडकोतर्फे रचण्यात येतंय.

याविरोधात नेरुळ येथील डीपीएस लेक बचावासाठी सर्व पर्यावरणवाद्यांनी एकत्र येत संवर्धन राखीव जागा म्हणून डीपीएस लेकला घोषित करण्याची मागणी केलेय.

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यातील थंडी गायब, उन्हाचा चटक्यांनी नागरिक हैराण

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाली असून उन्हाची तीव्रता जाणवायला लागली आहे..

फेब्रुवारी महिनाच्या सुरुवात पासुन उन्हाचे चटके बसू लागले आहेत.

उन्हाचा पारा 34 अंश सेल्सिअसपर्यंत पोचल्याने दुपारी कडक उन्ह तर, रात्री थंडी जाणवते.

मार्च महिन्यानंतर उन्हाची तीव्रता जाणवते. परंतु, यंदा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवाीपासून विचित्र असे वातावरण नंदुरबार जिल्ह्यात अनुभवायला मिळत आहे.

रात्री थंडी जाणवत असल्याने स्वेटर घालावे लागते. तर, दुपारी कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे दिसून येत आहे

Nashik: जिल्हा रुग्णालयाच्या आवारात ढोल ताशांचा गजर, सायलेन्स झोनचे उल्लंघन

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात खुद्द आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सायलेन्स झोनचे उल्लंघन केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी सायंकाळी घडला.

चतुर्थ श्रेणी कर्मचारी सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांना निरोप देण्याकरीता कर्मचाऱ्यांनी ढोल ताशा वाजवून निरोप दिला.

या निरोप समारंभास रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक, सहायक मेट्रेन अाणि वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

रुग्णालयापासून १०० मीटर अंतरा नो सायलेन्स झोन म्हणून घोषीत केलेला असतांना अारोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनीच या नियमाचे उल्लंघन केल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नियमाचे उल्लंघन झाल्याने जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे कार्यवाई करणार का हे बघणं महत्त्वाचा ठरणार आहे.

Pune: पुण्यातील मुंढवा एबीसी रोड परिसरातील एका पब हॉटेलमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी

याबाबतचा एक व्हिडीवो देखील व्हायरल झाला आहे.

शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला असून त्यामध्ये चार ते पाच जाणाचे डोके फुटल्याची माहिती आहे.

मागील काही दिवसापासून मुंढव्यात वाहने तोडफोड, जबरी चोऱ्या, हॉटेलमधील हुक्का अश्या घटना घडल्या आहेत.

याबाबत कुठलाही गुन्हा अजून दाखल नाही.

मुंढवा परिसरात पब मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.

Pune Metro: पुणे मेट्रोसाठी अर्थसंकल्पात ८३७ कोटींची तरतूद

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी ८३७ कोटी रुपयांची तरतूद जाहीर झाली आहे.

त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज (भुयारी) या मेट्रो मार्गिकांय्या कामांना आता वेग येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mumbai-Pune: मुंबई-पुणे रस्त्यावरील कॉल सेंटरवर छापा

‘एलआयसी’ पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक करणारे गजाआड

आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात एका कॉल सेंटरवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला.

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली.

आरोपींकडून पुणे परिसरातील नामांकित ३५ कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के, १५ मोबाइल संच, १५० सिम कार्ड आणि वेगवेगळ्या ३० बँकांची खाते पुस्तिका, धनादेश पुस्तिका जप्त करण्यात आल्या आहेत. प्राथमिक तपासात आरोपींनी दोघांची फसवणूक केल्याचे समोर आले असून, त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

बांगलादेशी/रोहींग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण, मालेगावात छावणी पोलिसांत गुन्हा दाखल

तिघे आरोपी अटक....

सय्यद साजिद, शबाना बानो, नजमा बानो आहे तिघा आरोपींचे नाव असून त्यांना छावणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे....

या तिघांना जन्म प्रमाणपत्र साठी बनावट कागदपत्र तयार केल्याचा संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

तिघा आरोपींना 4 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनाव्यात आली आहे....

किरीट सोमय्या यांच्या तक्रारी वरून 3977 अर्जदारांची चौकशी होणार.....

Malkapur: राष्ट्रीय महामार्ग ५३ वर रेल्वे उड्डाण पुलावर भीषण अपघात

राष्ट्रीय महामार्ग ५३ वर मलकापूर जवळ रेल्वे उड्डाण पुलावर दोन ट्रक समोरासमोर धडकून भीषण अपघात.

अपघातात दोन्ही ट्रक मधील चौघे जण गंभीर जखमी , चौघांची प्रकृती चिंताजनक

राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर एकेरी वाहतूक सुरू असताना घडला अपघात

अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.