Bollywood News : गायक यांच्या लीप किसिंग व्हिडिओचा वाद सगळीकडे पेटला असतानाच त्यांच्याबद्दलची एक जुनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. या पोस्टमध्ये उदित नारायण, कुमार सानू यांच्यावरvचुकीच्या वागणुकीवरून आरोप करण्यात आले आहेत. उदित नारायण हे सूत्रसंचालिकेशी बायकोसमोरच फ्लर्ट करत होते तर अलका याज्ञीक यांना गाताना कुमार सानू यांनी दोन-तीनदा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं.
रेडिट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बॉलिवूड ब्लाइंड्स अँड गॉसिप या पेजवरील ही पोस्ट पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. ही पोस्ट तीन वर्षांपूर्वीची असून सदर युजरने तीन वर्षांपूर्वी उदित, अलका आणि कुमार सानू यांच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. यावेळी आलेला अनुभव युजरने शेअर केला आहे. तर या ग्रुपच्या व्यवस्थापकाने तिने कॉन्सर्टचे तिकीट पाहिले असून ही पोस्ट खरी असल्याचा दावा केला आहे.
या पोस्टमध्ये म्हटलं आहे कि,"मी दशकात जन्माला आलो / आले असल्याने हा कॉन्सर्ट बघायला खूप उत्सुक होतो. मला फक्त ८० आणि ९० च्या चित्रपटांमधील आवाज आणि संगीत आवडते आणि मला सर्व गाणी माहित असल्याची खात्री होती. अनेक दशकांपासूनत्या गाण्याचे मूळ गायक आणि संगीतकारांनी थेट सादर केलेलं तुमचं आवडतं गाणं पाहणं हा एक अद्भुत अनुभव होता.
या तिन्ही गायकांनी वीस वीस मिनिटांचे एकल परफॉर्मन्स सादर केले आणि शेवटी ते एका परफॉर्मन्ससाठी एकत्र आले. कुमार सानू पहिले स्टेजवर आले आणि आम्ही पाहिलं की तो महिला होस्टवर असभ्य टिपण्या करत होते. ते तिचा हात आणि कंबर पकडून उभे होते. एक कलाकार म्हणून ती त्यांच्या कारकिर्दीबद्दलच्या काही खास गोष्टी सांगून त्यांचं कौतुक करत होती पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत म्हटलं कि,"आपको देख कर तो बोलती बंद हो गई है गाने कैसे गाऊ गा" यामुळे ती अस्वस्थ झाली आणि मला थोडा राग आला पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं कारण मला शोचा आनंद घ्यायचा होता.
त्यानंतर अलका स्टेजवर आल्या. त्यांनी काही उत्तम गाणी सादर केली. त्यांनी थोडस आम्हाला चिडवलं. काही सुंदर गाणी गेली. त्या जांभळ्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होत्या. एक दो तीन गाण्यावर त्यांनी केलेले हावभाव मला खूप आवडले.
by in
"त्यानंतर उदित स्टेजवर आले आणि काही भाग गाण्यासाठी त्यांच्या पत्नी दीपाही स्टेजवर आल्या. माझ्या मते ते सगळ्यात जास्त उत्साही होते, डान्स करत होते आणि स्टेजवर इतर दोघांपेक्षा खूप जास्त चालत होते. जेव्हा महिला होस्ट पुन्हा स्टेजवर आली, तेव्हा त्याने तिच्या दिसण्याबद्दल कमेंट्स केल्या आणि तिला अनेक वेळा स्पर्श केला. तिने त्यावर विनोद केला की, त्यांची पत्नीही उपस्थित आहे." परंतु त्यांनी म्हटलं की,पत्नी उपस्थित असणं चांगलं आहे पण बायकोबरोबर गर्लफ्रेंड असणंही चांगली गोष्ट आहे. मला धक्काच बसला, ती होस्ट जास्तीत जास्त 30 वर्ष वयाची असेल आणि खूपच प्रोफेशनल होती. शेकडोहून अधिक लोकांसमोर तिच्या शरीरावर टिप्पण्या करणे आणि वाईट बोलणे नक्कीच अपमानास्पद होते."
त्यानंतर थोड्याच वेळात उदित बॅकस्टेजला गेले आणि कुमार व अलका ड्युएट गाण्यासाठी बाहेर आले, ज्यामध्ये कुमार सानूने तिला अनेकदा स्पर्श केला. होय, गाण्यामध्ये हात आणि जवळ असण्याचा उल्लेख आहे, परंतु ती एक त्यांची आदरणीय सहकारी होती जी शांत राहण्याचा प्रयत्न करत होती.पण ते तिच्या खांद्यापासून सुरुवात करायचे आणि त्यांचे हात तिच्या हाताखाली सरकवायचे. एका क्षणी अलका यांनी कुमार यांना मारले आणि त्यावरून हे स्पष्ट झालं की त्यांना हे अजिबात आवडलं नव्हतं. गाणं संपताच त्या म्हणाल्या “सानू जी आप गाते मौका ना मारे” साहजिकच ते फ्लर्ट करत आहेत हे त्यांना कळलं. हे सगळं पाहणं खूप विरोधाभासी होतं. मी फक्त कल्पना करू शकतो/ शकते की हे कलाकार इतर कलाकारांबरोबर बॅकस्टेजला असताना काय करत असतील.
त्यानंतर उदित स्टेजवर आले म्हणजे हे तिघेही जण एकाच वेळी स्टेजवर होते. त्यांनीही कुमार सानू यांच्याप्रमाणे कृती केली तेव्हा अलका लगेच म्हणाल्या “आप भी शुरू मत होईये” कारण ते तिच्या जवळ येऊन तिच्यावर दबाव आणत होते. मी सुरुवातीला या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला पण हे सगळं खूप अति होतं आणि अलका या स्पर्शांना कसा प्रतिसाद देत आहे हे पाहून मी निराश झाले. स्टेजवर तुम्हाला जे आवडते ते करण्याचा प्रयत्न करण्याचा मी विचार करू शकत नाही आणि काही म्हातारे लोक तुम्हाला स्पर्श करत राहतात आणि तुम्हाला लाजवतात आणि छान प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीत, ते घडेपर्यंत हा एक चांगला शो होता आणि त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होते. या सर्व महिला गायकांना एकांतात काय सामोरे जावे लागते कोणास ठाऊक."
या पोस्टवर अनेकांनी कमेंटस करत गायकांच्या वागणुकीवर टीका केली आहे. तर आता हे किसिंग प्रकरणही गाजत आहे.