jalana Agro News : प्रस्तावित जालना नांदेड समृद्धी महामार्गात जालना तालुक्यातील देवमूर्ती गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीला सरकार कवडीमोल भाव देत असल्याचा आरोप करत देवमूर्ती येथील शेतकरी मागील सात दिवसापासून मोठ्या संख्येने धरणे आंदोलन करत आहे. सरकार आमच्या जमिनीला कवडीमोल भाव देत असून आमच्या जमिनीला योग्य तो भाव द्यावा ही प्रमुख मागणी घेऊन हे शेतकरी धरणे आंदोलन करत आहे. दरम्यान 5 फेब्रुवारीला शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील या शेतकऱ्यांनी दिला आहे.
निलंबनाविरोधात न्यायालयात दाद मागणार - पैलवान शिवराज राक्षेआई वडिलांचे आशिर्वाद घेत खेळाडुवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असून पंचाच्या चुकीच्या निर्णयामुळे खेळाडुचे नुकसान होते, चुकीचे निर्णय देणा-या पंचांवर कारवाईची मागणीही शिवराज राक्षेंनी केली असून पैलवान चंद्रहार पाटलांनी केलेल्या विधानाचे शिवराज राक्षे ने समर्थन केलय.
Nanded News : बिस्किट घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक लागली आगइंदूरवरून हैदराबादकडे बिस्किट घेऊन जाणाऱ्या कंटेनरला नांदेडच्या वसमत फाटा परिसरात आग लागण्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या आगीत कंटेनरचे आणि बिस्किट पुड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
Sangli Live Update : सांगलीत एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखी तिघांना अटकसांगली पोलिसांनी विटयातील एमडी ड्रग्ज प्रकरणी आणखी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.ड्रग्ज कारखान्यासाठी पैसे पुरवणारा,ड्रग्ज बनवणारा आणि ड्रग्ज सप्लाय करणारा,अशा तिघांचा यामध्ये समावेश आहे.यापैकी एक रायगड जिल्ह्यातल्या अलिबागचा तर दुसरा मुंबई आणि तिसरा सांगलीच्या वाळव्यातला असून जितेंद्र परमार,सरदार पाटील आणि अब्दुल रज्जाक शेख अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. जितेंद्र परमार हा अलिबागचा असून त्याने ड्रग्ज कारखान्यातील मशनरीसाठी आर्थिक मदत केली आहे,तर सांगलीच्या वाळव्यातल्या सरदार पाटील हा ड्रग्ज बनवण्याचे काम करत होता,तर मुंबईचा असणारा अब्दुलरजाक शेख हा ड्रग्ज सप्लाय करण्याचं काम करत होता.
Palghar Latest Newsपालघरच्या पूर्वेस असलेल्या मासवणसह पाच गावांच्या पाणीपुरवठा योजना मागील अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असल्याच्या विरोधात आक्रमक झालेल्या माजी पंचायत समिती सदस्य सचिन पिंपळे यांच्या सह शेकडो ग्रामस्थांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे . मासवन सह पाच गावांमध्ये जलजीवण मिशन आणि राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत 2019 आणि 2022 साली अशा दोन वेगवेगळ्या योजनांचा काम हाती घेण्यात आलं मात्र सहा वर्ष उलटली तरी देखील या योजना पूर्ण झाल्या नसल्याने येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते . पालघर जिल्ह्यासह वसई विरार या महानगरांची तहान भागवणाऱ्या सूर्या नदीच्या तीरावर ही सर्व गाव असताना देखील याच गावांमधील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने शेकडो ग्रामस्थांनी आज आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे . तसंच योजना पूर्ण करून ठेकेदाराने अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील यावेळी उपोषण करते सचिन पिंपळे यांनी दिला आ
Maharashtra Live Update : एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा- येत्या १३ फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक दौरा
- एकनाथ शिंदे यांचा नाशिकला आभार दौरा
- १३ फेब्रुवारीला एकनाथ शिंदे यांची नाशिकमध्ये जाहीर सभा
Kolhapur News : मशिदीवरील भोंगे हटवा: कोल्हापुरात हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने निदर्शनेकोल्हापूर शहरातल्या मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरालच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केले. मशिदी वरील भोंगांमुळे जर नागरिकांना त्रास होत असेल तर मशिदी वरील भोंगे जप्त करावेत असे निर्देश 23 जानेवारी 2025 रोजी उच्च न्यायालय दिले आहेत. मात्र गेले आठ दिवस झाले अनधिकृत भोंग्या विरोधात तक्रार अर्ज देऊनही कारवाई न झाल्याने आज हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केल गेलंय.
Nashik : पाण्यासाठी सिडकोतील रायगड चौकात महिलांचा काही काळ रास्तारोको- पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको
- मागील काही दिवसांपासून रायगड चौक परिसरातील पाणी पुरवठा झालाय विस्कळीत
- महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष केलं जात असल्यानं महिला आणि नागरिक आक्रमक
- महिलांच्या रास्ता रोको आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत
- काही माजी नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर रास्ता रोको आंदोलन मागे
- मात्र येत्या २ दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा
तृप्ती देसाईवाल्मीक कराड 15 आणि 16 डिसेंबर रोजी दिंडोरी आश्रमात मुक्कामाला होता, तो 17 डिसेंबर रोजी दिंडोरी आश्रमातून निघाल्यानंतर नाशिक शहरातील "शरणपूर रोड" येथे हस्तरेषातज्ञांकडे भविष्य बघण्यासाठी गेला होता. खंडण्या मागायच्या ,इतरांचे आयुष्य उध्वस्त करायचे आणि स्वतःच भविष्य बघायला एखाद्याकडे जायचं ही क्रूर मानसिकता आहे. नाशिक पोलिसांनी 17 डिसेंबरचे शरणपूर रोडचे सीसीटीव्ही तपासावेत आणि ज्यांच्याकडे तो गेला होता ते सीसीटीव्हीमध्ये दिसल्यानंतर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात यावा. Crime News : सात वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ डहाणू बंदची हाकसात वर्षीय चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ आज डहाणू बंदची हाक . डहाणूत साठ वर्षीय नराधमाने खाऊच आमिष देऊन सात वर्षीय चिमुकलीचा केला होता लैंगिक अत्याचार . डहाणूतील संघटनांकडून आज दिवसभर डहाणू बंदची हाक . बंदला डहाणूकरांसह व्यापारी संघटनांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद . डहाणू शहर कडकडीत बंद . दोन वाजता डहाणू इराणी रोड ते डहाणू पार नाका असं निषेध मोर्चाच आयोजन .
Maharashtra Live Update : आक्रमक नारायण राणे आणि निलेश राणे यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दमसिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकारी थातूरमातूर उत्तर देऊन कागद ग्रामस्थांच्या तोंडावर फेकत आहेत ते झोपा काढण्याचं काम करतात. असा आरोप करत यापुढे असे प्रकार चालू देणार नाही असा इशारा आमदार निलेश राणे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत दिला. पालकमंत्री नितेश राणे यांनी निलेश राणे यांच्या तक्रारीची दखल घेत सभागृहात दीलगिरी व्यक्त केली यापुढे असा अधिकारी आढळल्यास त्याच्यावर कारवाई होईल. अधिकाऱ्यांची अशी उत्तर खपवून घेणार नाही असं सांगत अधिका-यांना समज दिला. खासदार नारायण राणे यांनी सुद्धा अशा अधिकाऱ्यांचा बेशिस्तपणा जिल्ह्यात खपवून घेणार नाही असा इशारा दिलाय. जिल्हा नियोजन ची बैठक आज सिंधुदुर्ग जिल्हात सुरू आहे. या बैठकीत आमदार निलेश राणे, नितेश राणे आणि नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांच्या बेशिस्त वर्तणूकीचा समाचार घेतला.
Maharashtra Live Update : मालेगावात भीषण अपघात, एकाचा मृत्यू- मालेगाव वर्हाणे पाडा शिवारात पुणे इंदोर महामार्गावर भीषण अपघात...
- आज सकाळच्या सुमारास समोरा समोर दोन कंटेनरची झाली धडक...
- अपघातात एक जण जागीच ठार...
- मालेगाव मनमाड रस्त्यावर तीन तासांपासून वाहतूक ठप्प..
- स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्तांना रुग्णालयात केले दाखल.
पेणच्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यूरायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. खुशबू नामदेव ठाकरे असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. चुकीचे औषधोपचार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. शासनाच्या कुसुम योजने अंतर्गत शाळेत आरोग्य शिबीर घेण्यात आले होते. यावेळी खुशबू हिला कुष्ठरोग झाल्याचे निदान करून तिला गोळ्या सुरू करण्यात आल्या होत्या. या गोळ्या सुरू झाल्यानंतर तिला त्रास सुरू झाला. तिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिला कुष्ठरोग नव्हता असा तिच्या पालकांचा दावा आहे. दरम्यान या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधिक्षक यांना आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
गुजरातमधील गोध्रा हत्याकांडातील 11 वा मुख्य आरोपीला आळेफाटा पोलीसांनी केली अटकमागच्या पाच महिन्यापुर्वी सात दिवसांच्या रजेवर बाहेर आल्यानंतर फरार झाला
गोध्रा हत्याकांडातील प्रकरणात शिक्षा भोगत असताना पेरोलवर बाहेर आल्यानंतर
मंचर,नाशिक,सिन्नर परिसरात चोरी केल्याची कबुली दिलीय
सलीम जर्दा मुळचा गोध्रा फरार झाल्यानंतर सलीम जर्दा याने सहकार्यासमवेत
पुणे नाशिक नगर जिल्ह्यात चोरी केल्यात सलीम ऊर्फ जर्दा याच्यावर महाराष्ट्र गुजरातमध्ये १६ गुन्हे दाखल
आरोपीचा ताब्यात घेण्यासाठी गुजरात पोलीसांचे पथक सिन्नर पोलीस स्टेशन ला दाखल
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक- प्रयागराजमध्ये कुंभमेळ्या दरम्यान चेंगरा चेंगरीची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक
- राज्याचे अप्पर मुख्य गृह सचिव आय एस चहल यांच्या उपस्थितीत बैठक
- बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित
- नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्या दरम्यान चेंगरा चेंगरी अथवा कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी बैठक
- राज्याच्या अप्पर मुख्य गृह सचिवांकडून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा घेतला जातोय आढावा
ताप्ती गंगा एक्सप्रेस मधल्या हल्यातील एका जखमीचा दुर्दैवी मृत्यू- सुमेरसिंग जबरसिंग या 24 वर्षीय जखमी युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यु
- अतिरक्त स्त्राव झालेल्या रात्री उशीरा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु
- लोहमार्ग पोलीसांनी रात्री उशीरा या घटनेप्रकरणी खुणाचा गुन्हा केला दाखल
- ताप्तीगंगा एक्सप्रेसच्या जनरल बोगीमध्ये बसण्याच्या जागेवरुन झालेल्या वादानंतर नंदुरबार रेल्वे स्टेशनवर करण्यात आला होता धारदार शस्त्राने हल्ला
- गुन्ह्यातील आरोपी अद्यापही फरार
रानडुकरांच्या कळपाकडून गहू पिकाचे अतोनात नुकसान...वाशिम तालुक्यातील वाई येथील शेतकरी उत्तमराव नप्ते यांच्या गव्हाच्या पिकात घुसून रानडुकरांच्या कळपाने काढणीला आलेल्या पिकाचे मोठ नुकसान केलं आहे. रात्रीच्या वेळी रानडुकरांनी शेतात घुसून गव्हाच्या पिकाची मोठी नासधूस केली, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
वन मंत्री गणेश नाईक यांचा आज जनता दरबारजनता दरबारात न्याय मागण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी.
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील शेकडो नागरिक वाशी मध्ये जनता दरबारासाठी उपस्थित.
11 वर्षानंतर गणेश नाईक मंत्री म्हणून घेणार आहेत जनता दरबार.
काही वेळात गणेश नाईक उपस्थित राहणार.
पुण्यातील गुन्हेगारांना बनावट जामिन दिल्याप्रकरणी दोन नामांकित वकिलांना अटकपुणे गुन्हेगारांना बनावट जामिन दिल्या प्रकरणी हडपसर मधील 2 नामांकित वकिलांना वानवडी पोलिसांनी केली अटक..
वकील अस्लम सय्यद आणि योगेश जाधव यांना अटक
शेकडो गुन्हेगारांना जमिनीसाठी बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून वकील आरोपी मिळून देत होते जामीन
अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींना जामीन होण्यासाठी लागणारे कागदपत्र दोन्ही वकील बनावट तयार करुन कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करत
न्यायालयासमोर बनावट जामीनदार सुद्धा उभे करत असल्याची माहिती
प्रकरणी दोन्ही आरोपींना वानवडी पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे
अजूनही अनेक वकिलांची टोळी अशा पद्धतीने बनावट जामीनदार उभा करून जामीन मिळवून देण्यासाठी सक्रिय आहे अशी माहिती समोर
उमरगा येथील एमएसईबीच्या कार्यालयाकडून बस स्थानकातील स्वच्छालयास लावले कूलूपधाराशिवच्या उमरगा बस स्थानकातील स्वच्छालयाच्या दुर्गंधीमुळे ञास होत असल्याने शेजारी असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी एसटी महामंडळाच्या स्वच्छालयास कूलूप लावून बस स्थानकातील स्वच्छालय बंद केले आहे.दरम्यान या स्वच्छलयाची स्वच्छता करण्याची वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष केल जात असल्याने एमएसईबी च्या कर्मचाऱ्यांनी या स्वच्छलयाला कुलुप लावले आहे.
"ऑपरेशन टायगर" चा एक अंक पुण्यात सुद्धा पाहायला मिळणारपुण्यातील ३ माजी आमदार या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शिवसेनेत करणार प्रवेश
तीन माजी आमदारांसह आणखी ६ जणं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेत पहायला मिळणार मोठं इन्कामिंग
काँग्रेस चे २ नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ४ जणं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात
शिवसेनेत लवकरच प्रवेश करणाऱ्या पुण्यातील अनेकांची एकनाथ शिंदे यांच्यासह इतरांशी चर्चा आणि बैठका सुरू
महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी ऑपरेशन टायगर सक्रीय
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; जीबीएस रुग्णांवर चर्चा होणारआरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत
जीबीएस रुग्णांची संख्या वाढत आहे याविषयी चर्चा करणार
राज्यात पहिल्यांदाच सामाजिक वॉररूम उभारण्यात येणारसामाजिक वॉररुम याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याविषयी मंत्रालय बैठक घेणार आहेत
या वॉररूम मधून केद्र सरकार , राज्य सरकार योजना तसेच समाजिक उपक्रम याचा आढावा घेतला जाणार
या अगोदर पायाभूत प्रकल्प साठी आढावा साठी वॉररूम तयार करण्यात आली होती
या प्रकल्प तसेच सामाजिक क्षेत्र यासाठी अश्या दोन वॉररूम असणार
ज्या योजना थेट जनतेशी निगडीत आहेत अशा योजनांचा आढावा सामाजिक वॉररूम म्हणून घेतला जाईल.
वाल्मिक कराडची सांगलीतील घोटाळयाप्रकरणी चौकशी करा - स्वाभिमानी स्वराज सेनेचे मागणी..बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकते असणाऱ्या वाल्मिक कराड याची सांगलीतील स्वाभिमानी स्वराज सेनेकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आलं आहे.सांगलीतील एका तत्कालीन कृषी अधिकारी मुकुंद जाधवर याच्या घोटाळ्या प्रकरणी आंदोलन केल्यानंतर आपल्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल झाला होता,सदर गुन्हा वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे स्वीय सहाय्यक जोशी यांच्या दबावातून दाखल केल्याचा आरोप देखील स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर- शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर
- दुपारी बारा वाजता संजय राऊत नाशिकमध्ये पोहोचणार
- ठाकरे गटाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत राऊत यांची बैठक
- ८ दिवसांत संजय राऊत दुसऱ्यांदा नाशिक दौऱ्यावर
- तर संध्याकाळी ठाकरे गटाचे नेते वसंत गीते यांच्या मुलाच्या लग्नाला लावणार उपस्थिती
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 'धर्मोपासक' पुरस्कार प्रदान- सद्गगुरू सेवा परिवार ट्रस्टच्यावतीने केंद्रीय मंत्री गडकरी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला
- राजकारण हे राष्ट्रकारण, समाजकारण आणि धर्मकारण आहे,आणि राजसत्तेला धर्मगुरूंचा आशीर्वाद असतो
- त्यामुळे या पुरस्कारामुळे उत्तम कार्य करण्याचा आशीर्वाद मिळत असल्याचे नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
कथित एम पी एस सी पेपर विक्री प्रकरणात आणखी २ जणांना अटकएकाला भंडारा जिल्ह्यातून तर दुसऱ्याला मध्य प्रदेशातून अटक
एम पी एस सी चे पेपर ४० लाख रुपयांना देतो असे कॉल काही विद्यार्थ्यांना येत होते
या ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर सुद्धा सोशल मीडियावर झाले होते व्हायरल
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट (ब) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात आली
योगेश सुरेंद्र वाघमारे (वय 27) याला भंडारा जिल्ह्यातून अटक करण्यात आली तर दीपक यशवंत साकरे (वय 27) याला मध्य प्रदेशच्या बालाघाट येथून अटक करण्यात आली
या दोन्ही तरुणांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे
याप्रकरणी आधी ३ जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली होती
Pune : महाराष्ट्रात मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढणार - सामंतमराठी भाषा विभागाची आणि राज्यातील पोलिस दलाची लवकरच याबाबत होणार बैठक
मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत आणि राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक
भाषेच्या संवर्धनासाठी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात मराठी भाषा विभागाकडून उचलण्यात येणार ठोस पावले
पोलिस महासंचालक यांच्याशी सुद्धा विभाग चर्चा करण्याची शक्यता
मुंबई, ठाणे, पुणे याठिकाणी मराठी न बोलण्यावरून अनेक वाद निर्माण झाले होते
Pune News : बेशिस्त नागरिकांवर पुढे महानगरपालिकेचा कारवाईचा बडगासार्वजनिक ठिकाणे अस्वच्छ करणाऱ्या सात हजार नागरिकांवर महापालिकेची कारवाई
पुणे महापालिकेकडून 60 लाख रुपयांचा दंड वसूल
पुण्यातील कोंढवा परिसरातून सर्वाधिक नऊ लाख 19 हजार 298 रुपयांचा दंड वसूल
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा जाळणे, प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणे, कबुतरे आणि पारव्यांना उघड्यावर खाद्य टिकणे असे कृत्य करणारे नागरिकांवर कारवाई
pune News : आरटीई खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत संपलीआरटीई खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत अर्ज करण्याची मुदत संपली
या मुदतीत ३ लाखांहून अधिक अर्ज दाखल झाले
आता अर्ज प्रवेशासाठी सोडत काढण्यात येणार
आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार रविवारी सायंकाळपर्यंत ३ लाख ३ हजार १३८ अर्ज दाखल
आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात येतो
यंदा राज्यभरातील ७ हजार ८६३ शाळांमध्ये प्रवेशासाठी १ लाख ९ हजार १११ जागा उपलब्ध
crime News : लोणावळ्याच्या वेहरगाव येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई, दहा जणांवर गुन्हा दाखल..पुणे ग्रामीण पोलीस दलाने संकल्पनाशा मुक्ती अभियान अंतर्गत वेहरगाव येथे मटका अड्ड्यावर मोठी कारवाई केली. वेहरगाव येथील संतोष बोत्रे यांच्या पडीत जमिनीवर काही व्यक्ती कल्याण मटका खेळत आहेत या माहितीच्या आधारावर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने छापा टाकला आणि मटका खेळणाऱ्या सह मटका घेणाऱ्या दहा जनावर कारवाई केली. या छापा मारीत पोलिसांनी एकूण एक लाख 64 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला यामध्ये रोख रक्कम, जुगार साहित्य, मोटरसायकल, पावती पुस्तके, आणि मोबाईल फोन याचा समावेश आहे. पोलिसांच्या यशस्वी कामगिरीमुळे विहारगाव परिसरात मटका खेळणाऱ्या वर आणि घेणाऱ्यावर कठोर कारवाई केली गेली आहे. पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीमुळे जुगार अंड्याचे नेटवर्क तोडण्यात यश आले आहे.
Akola News : अकोल्यात हेल्मेटसक्तीअकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्ती सुरु झालीऐ.. अकोला पोलीस दलाने अकोटमध्ये हेल्मेट जनजागृती रॅली काढली.. सार्वजनिक सुरक्षितता व प्रवासादरम्यान हेल्मेट वापरण्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ही जनजागृती रॅली होती.. मागील पाच वर्षामध्ये वाहन चालवितांना हेल्मेट न घातल्यामुळे अकोला जिल्ह्यात 223 मोटार सायकलस्वारांना आपला जिव गमवावा लागला.. आणि 140 मोटार सायकलस्वार जखमी झाले होते. म्हणून या रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांनी हेल्मेट घाला, सुरक्षित प्रवास करा आणि आपल्या स्वतःच्या कुटूंबासाठी हेल्मेटचा वापर करा, असे नागरिकांना आवाहन करुन जनजागृती करण्यात आली. रॅली दरम्यान मोटार सायकलस्वार व नागरिकांना हेल्मेटचे महत्व पटवुन सांगण्यात आलेऐ. या रॅलीचे नेतृत्व IPS अधिकारी अनमोल मित्तल यांनी केलंय. पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी मोटार सायकलसह सहभागी झाले होते. अकोट शहर रॅली पोलीस स्टेशन येथून या जनजागृती रॅलीला सुरुवात झाली अन अकोला नाका, त्यानंतर शिवाजी चौक, मच्छी मार्केट, अंजनगाव रोड, धारोळीवेस चौक यामार्गाने परत पोलीस स्टेशनला रॅलीचा समारोप करण्यात आला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लांज्यात गळतीशेकडो कार्यकर्त्यांनी केला शिवसेना ( शिंदे ) पक्षात प्रवेश
आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश
यापुर्वी देखील लांज्यातील पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी केला होता पक्ष प्रवेश
लांजा - राजापूर मतदार संघ शत:प्रतिशत शिवसेना करण्याचा आमदार किरण सामंत यांचा निर्धार
जिल्हापरिषद , पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रांपंचायतीवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी
माजी आमदार राजन साळवी ( उबाठा) यांचा हा मतदार संघ
jalana Crime : जालन्याच्या लोणी गावात गोळीबाराची घटनाजालन्याच्या लोणी गावात गोळीबाराची घटना घडलीये. बुलेटवर येत हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न रविवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान तीन आरोपींकडून करण्यात आलाय. जालना जिल्ह्यातल्या परतुर तालुक्यातील लोणी गावात ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. बुलेटवर आलेल्या तिघांपैकी एकाने हवेत चार गोळ्या फायर केल्याची माहिती समोर आली असून आरोपींना आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या प्रकरणी आष्टी पोलिस अधिकचा तपास करीत आहेत.
Sangli News : कृष्णा नदीवर आयर्विन पुलाला बांधण्यात येणारया समांतर पुलाचे काम रखडलेसांगली शहरातल्या कृष्णा नदीवर आयर्विन पुलाला समांतर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम,गेल्या काही महिन्यांपासून रखडलेला आहे. जिल्हा शासनाचे आणि बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे पुलाचे काम लवकर पूर्ण कारावी अशी मागणी नागरिकां मधून होत आहे. आयर्विन पुलाला समांतर आणि पर्यायी पूल म्हणून कृष्णा नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे. महाविकास आघाडीच्या काळात पुलाच्या कामाचे उद्घाटन झाले होते. मात्र 3 वर्ष उलटून देखील अद्याप पुलाचे काम पूर्ण होऊ शकले नसून संथ गतीने सुरू आहे. लवकर पूल चालू करावा अशी नागरिकांची मागणी आहे.
Dhule News : धुळ्यात थंडीचा जोर अद्यापही कायमधुळ्यात थंडीचा जोर अद्यापही जाणवत असून आज धुळ्यात 10.5° अंश डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे, गेल्या काही दिवसांपासून दिवसभर उन्हाचा कडाका आणि रात्री थंडीचा जोर वाढला असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे धुळेकर नागरिकांना गर्मी व थंडीचा दोघांचाही अनुभव येत आहे,
राज्यात इतरत्र थंडीचा जोर कमी झालेला असताना धुळ्यात मात्र अद्यापही गारठा कायम असल्याचे दिसून येत आहे.
रत्नागिरी - जिल्हा शासकीय रुग्णालयाच 4 डायलिसीस मशीनचं लोकार्पणअंत्योदय प्रतिष्ठान व मी मुंबई अभिमान अभियान प्रतिष्ठान यांच्यामार्फत प्राप्त 4 डायलिसीस मशीन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण
यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार नारायण राणे, आमदार प्रसाद लाड, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम उपस्थित
डायलिसीस मशीनमुळे जिल्ह्यातील रुग्णांना याचा फायदा होणार आहे
Sangli News : 'ईव्हीएम 'ऐवजी मतपत्रिकेवरच निवडणुका घ्या - बहे ग्रामपंचायतीचा ग्रामसभेत ठरावईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात, असा ठराव सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बहे ग्रामपंचायतीने केला आहे. नुकत्याचा पार पडलेल्या ग्रामसभेत मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा ठराव करण्यात आला आहे.10 जानेवारी रोजी पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये हा एकमताने ठराव संमत करण्यात आला आहे,त्याचबरोबर या ठराव्याचं पत्र इस्लामपूरच्या तहसीलदारांकडे देण्यात आले आहे. लोकशाहीत निवडणूक आणि मतदान ही संवैधानिक प्रक्रिया आहे. याआधी मतपत्रिकेवर मतदान घेतलं जात होतं.त्यामुळे ईव्हीएमवरील निवडणूक प्रक्रिया संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. त्यामुळे निवडणुका या ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर घ्यावेत. अशी मागणी बहे ग्रामपंचायतीने केली आहे.
Crime : नागपूरात पोलीस विभागाच्या बीट मार्शलकडूनंच नक्षल अभियानाच्या पोलीस निरीक्षकाला मारहाण- नागपूरात पोलीस विभागाच्या बीट मार्शलकडूनंच नक्षल अभियानाच्या पोलीस निरीक्षकाला मारहाण
- नागपूरातील वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील बारमधील घटना
- दोन बीट मार्शलकडून नक्षलविरोधी अभियानचे पोलीस निरीक्षकाला मारहाण
- बारमधून ओढत पोलीस स्टेशनमध्ये नेले आणि तिथेही केली मारहाण, ओळख सांगीतल्यावरंही केली मारहाण
- पोलीस नितीक्षकांचा कानाचा पडदा फाटला, कपाळाला लागलं,
- पोलीसांनी पंकज मडावी या पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय
- जेवायला गेलेल्या बारमध्ये होणार वाद पोलीस निरीक्षक यांनी सोडवला,
- मात्र त्यावादासाठी पोहचलेल्या बिट मार्शलने चक्क पोलीस निरीक्षक असल्याचं सांगीतल्यावरही मारहाण सुरुचं ठेवत जीवे मारण्याची धमकी दिली..
कोल्हापूरपूर जवळ मध्यरात्री ट्रॅव्हल उलटलीकोल्हापूरपूर जवळ मध्यरात्री ट्रॅव्हल उलटली
१ ठार तर ३० जखमी तर जखमी पैकी ४ गंभीर
गोव्या वरून छत्रपती संभाजी नगर कडे जाणाऱ्या खाजगी बसला कांडगाव जवळ अपघात
जखमींवर कोल्हापूर मधील CPR आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू
जखमी आणि मृत सर्वजण छत्रपती संभाजी नगरचे रहिवाशी
छत्रपती संभाजी नगरचा कंपनीत कामाला असणारे हे सर्व सहलीसाठी गोव्याला गेले होते...
गोव्यावरून परतत असताना कांडगाव इथल्या तीव्र वळणावर बस पलटी होऊन हा अपघात झाला आहे.
Nagpur : - नागपुरातील छोटे स्टेडियम आणि मैदानांच्या विकासासाठी 150 कोटी मिळणार- नागपुरातील छोटे स्टेडियम आणि मैदानांच्या विकासासाठी 150 कोटी मिळणार
- खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून नागपूर शहरात क्रीडा संस्कृती तयार झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले
- आतापर्यंत शंभर कोटी रुपयांच्या माध्यमातून विविध मैदानांचा विकास करण्यात आला आहे
- यानंतर शहरातील छोटे मैदानाच्या विकासासाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी दिला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली
- यावेळी मंचावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक खेळाडू उपस्थित होते
nashik : 6 वर्षीय बिबट्याचा मृत्यू- नाशिक पुणे महामार्गावर मोहदरी घाटात वाहनाच्या धडकेत 6 वर्षीय बिबट्याचा मृत्यू
- रविवारी रात्री उशिरा घडली घटना
- महामार्ग ओलांडत असताना चारचाकी वाहनाने दिली जोरदार धडक
- वाहनाच्या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू
- वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याचं शव शवविच्छेदनासाठी मोहदरी वन उद्यानात नेला
Nashik : आज नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक- शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक
- गेल्या काही दिवसांपासून नाशकात पक्षात दोन गट पडल्याचे चित्र, या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व
- शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांच्यासह सर्व महत्त्वाचे पदाधिकारी राहणार बैठकीला उपस्थित
- पक्षात सुरू असलेल्या गटबाजीवर दादा भुसे मध्यस्थी करून काही तोडगा काढतात का? याकडे लक्ष
- गेल्या काही दिवसांमध्ये पक्षाकडून घेण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये दिसून येतेय गटबाजी