LIVE Breaking: राज्यासह, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर…
Marathi February 04, 2025 10:24 AM

<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">Maharashtra 4th February Breaking News Live Updates: राज्यासह, देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये एका क्लिकवर आपल्याला पाहता येणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरण, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गोंधळ यांसारख्या महत्त्वाच्या घडामोडी राज्यात, देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत.  

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय…

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर आता राज्य सरकारकडून देखील मराठी भाषेला अधिक सक्षमपणे व प्रभावाने रुजविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येते. शासकीय कार्यालयाने आणि शासन स्तरावरील सर्वच प्रक्रियेत माय मराठीचा अधिकाधिक व सक्तीचा वापर करण्यासंदर्भात राज्यातील फडणवीस सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी आता सर्वच शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिवार्य असणार आहे. तसेच, या कार्यालयात मराठी भाषेत बोलण्याबद्दल दर्शनी भागात फलका लावावा लागणार आहे, शासकीय कार्यालयांतील संगणकावरील कळफलक ही मराठी भाषेतच असणार आहेत. तर, मराठी भाषेचा वापर करण्यास नकार देणाऱ्यांवर देखील शिस्त भंगाची कारवाई केली जाणार असल्यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.