इंग्लंडला T20 मध्ये नाचवलं, आता वन डे मध्येही नाचवणार, भांबावून सोडणारा फिरकीपटू टीम इंडियात दा
Marathi February 04, 2025 10:24 PM

भारत वि इंग्लंड एकदिवसीय: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडविरुद्ध (IND Vs ENG) घरच्या मैदानावर टी 20 आणि वन डे मालिका खेळत आहे.  पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी करत 4-1 ने विजय मिळवला. या मालिकेनंतर आता दोन्ही संघ 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आमने-सामने येणार आहेत. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वाखाली भारताच्या वन डे मालिकेला 6 फेब्रुवारीपासून नागपूरमधून सुरुवात होत आहे.

फिरकीपटूने टी 20 मध्ये नाचवलं, आता वन डेमध्ये नाचवणार

वनडे मालिका आणि त्यानंतर होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघ व्यवस्थापनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्तीला भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. सुरुवातीला त्याला सरावासाठी संघात स्थान देण्यात आले असले, तरी मिळालेल्या माहितीनुसार, तो इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी अंतिम संघात स्थान मिळवू शकतो.

वरुणची एन्ट्री, वॉशिंग्टनवर टांगती तलवार

दरम्यान, वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत जबरदस्त कामगिरी केली होती. पाच सामन्यांमध्ये त्याने 14 विकेट्स घेतल्या. त्याची सरासरी केवळ 9.85 होती. या दमदान कामगिरीमुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.

दरम्यान, पीटीआयच्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापनाने वरुण आपल्या फॉर्ममध्ये कायम राहावा यासाठी ही तजवीज केली आहे. कारण वरुणने टी ट्वेण्टीमध्ये कामगिरी चांगली केली असली, तरी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने त्याला वन डे मध्ये स्थान देऊन त्याची तयारी करुन घेतली जात आहे.
जर वरुणला वनडे मालिकेसाठी अंतिम संघात स्थान मिळाले, तर वॉशिंगटन सुंदरला संघाबाहेर जावे लागू शकते.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघात संधी मिळणार?

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी अंतिम संघ बदलण्याची मुदत 12 फेब्रुवारीपर्यंत आहे. सध्याच्या संघात तीन फिरकीपटू आहेत , यामध्ये डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल तसेच ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. संघातील एकमेव लेगस्पिनर कुलदीप यादव ऑक्टोबर 2024 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यामुळे त्याच्या निवडीबाबत सांशकता आहे.

संघ व्यवस्थापनाला जर वरुण चक्रवर्तीला मैदानात उतरवायचं असेल, तर त्यांना निवड समितीशी चर्चा करावी लागेल. मात्र, याबाबत अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही.

भारत-इंग्लंड वनडे मालिकेचं वेळापत्रक

पहिला वनडे – 6 फेब्रुवारी, नागपूर
दुसरा वनडे – 9 फेब्रुवारी, कटक
तिसरा वनडे – 12 फेब्रुवारी, अहमदाबाद

हेही वाचा :

Abhishek Sharma: टीम इंडियाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मासोबत डेटिंगची चर्चा; कोण आहे ती मिस्ट्री गर्ल?, PHOTO

समय रैनाचा ‘इंडियाज गॉट लॅटेन्ट’ कार्यक्रम अडचणीत, थेट पोलिसात तक्रार दाखल; नेमका आक्षेप कशावर?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.