Tarun khanna: ९ वर्षात ११ वेळा साकारणार महादेवची भूमिका; 'या' अभिनेत्याने रचला अनोखा रेकॉर्ड
Saam TV February 05, 2025 12:45 AM

Tarun khanna : सोनी सब टीव्हीवरील 'वीर हनुमान - बोलो बजरंग बली की जय' या मालिकेत अभिनेता तरुण खन्ना भगवान शिवाच्या भूमिकेत दिसणार आहे. तरुण गेल्या ९ वर्षांत ११ व्यांदा तरुण खन्ना भगवान शिवाची भूमिका साकारणार आहे. हा प्रसिद्ध टीव्ही अभिनेता या कामासाठी खूप उत्सुक आहे. खरंतर, गेल्या वर्षी तरुणने कलर्स टीव्हीवरील 'शिवशक्ती' या मालिकेत 'भगवान इंद्र'ची भूमिका साकारली होती. त्याला भगवान शिवाव्यतिरिक्त दुसरे काही पात्र साकारायचे होते. लोकांना त्याचे इंद्राचे पात्र खूप आवडले. पण तो शिवाच्या व्यक्तिरेखेशी इतका जोडलेला आहे की प्रेक्षक त्याला 'भगवान शिव'च्या रूपात पाहू इच्छितात आणि म्हणूनच तरुण पुन्हा एकदा सोनी सब टीव्हीवर भगवान शंकराच्या अवतारात दिसणार आहे.

हा पहिला भारतीय टीव्ही अभिनेता आहे ज्याने वेगवेगळ्या टीव्ही मालिकांमध्ये ११ वेळा एकच भूमिका साकारली आहे. भारतीय टीव्हीच्या इतिहासात त्याने एक नवा विक्रम रचला आहे. भगवान शिवाची भूमिका साकारण्यापूर्वी तरुण खन्नाने अनेक वेळा टीव्ही शोमध्ये खलनायकाची भूमिका साकारली आहे. २०१५ मध्ये, तरुण खन्ना पहिल्यांदाच &TV वरील 'जय संतोषी माँ' या मालिकेत शिवाच्या अवतारात दिसला. या मालिकेनंतर लगेचच, २०१६ मध्ये, तरुणने सिद्धार्थ कुमार तिवारी यांच्या 'कर्मफल दार शनि' या शोमध्ये भगवान शंकराची भूमिका देखील केली.

त्यानंतर २०१८ मध्ये, परमवीर श्री कृष्ण मध्ये, २०१८ मध्ये, राधा कृष्ण मध्ये आणि २०१९ मध्ये, राम सिया के लव कुश आणि नमः मध्ये, तरुण खन्नाने भगवान शिवाच्या रूपात सर्वांचे मन जिंकले. देवी आदि पराशक्ती, जय कन्हैयालाल की, कथा विश्वास की इतिहास आणि श्रीमद् रामायणातही त्यांनी महादेवची भूमिका साकारली. १० टीव्ही मालिकांमध्ये शिवची भूमिका साकारल्यानंतर, तरुण आता ११ व्यांदा त्याच शैलीत तरुण दिसणार आहे.

हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका

तरुण खन्ना '' मध्ये भगवान शिवाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत प्रसिद्ध टीव्ही अभिनेता माहिर पंधी हनुमानाची भूमिका साकारताना दिसणार आहे. माहिरची ही पहिली पौराणिक मालिका आहे. लवकरच हा शो सोनी सब टीव्ही आणि ओटीटी अॅप सोनी लिव्हवर प्रसारित होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.