World Cancer Day 2025: कर्करोग (Cancer) हा वेळेवर ओळखल्यास उपचाराने नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. मात्र, त्याच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तो गंभीर रुप धारण करू शकतो. 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो, यानिमित्त जाणून घेऊया कर्करोगाची काही महत्त्वाची लक्षणे.
कर्करोगाची प्रमुख लक्षणेअनावश्यक वजन कमी होणे
जेव्हा कोणतंही स्पष्ट कारण नसताना आपल वजन कमी होतं, तेव्हा त्याला अनपेक्षितपणे वजन कमी होणं म्हणतात. 5 किलो किंवा त्याहून अधिक वजन अचानक कमी होणं हे कर्करोगाचं पहिलं लक्षण असू शकतं. स्वादुपिंड, पोट, अन्ननलिका किंवा फुफ्फुसाच्या कर्करोगात हे वारंवार होतं.
थकवा आणि अशक्तपणा
सतत , कमकुवतपणा जाणवणे आणि कोणतेही काम न करता दमल्यासारखे वाटणे ही देखील लक्षणे असू शकतात. पण, काही कर्करोगांमध्ये, जसं की ल्युकेमिया ज्याच्या सुरुवातीलाच खूप थकवा येऊ शकतो. कोलन किंवा पोटाच्या कर्करोगामुळे रक्त कमी होऊ शकते, त्यामुळे थकवा येऊ शकतो.
बऱ्या न होणाऱ्या जखमा
त्वचेवर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर जखम झाल्यास ती बरी न होणे, सतत रक्तस्त्राव होणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. घसा बरा होत नसेल तर तो तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. तोंडातील कोणताही बदल जास्त वेळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, पुरुषांच्या जननेंद्रियावर किंवा योनिमार्गावर फोड आल्यास ते संक्रमण किंवा कर्करोगाचे लक्षण असू शकते, त्यामुळे त्वरित तपासणी करावी.
अनियमित रक्तस्त्राव
महिलांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान जास्त रक्तस्त्राव होणे किंवा वेदनादायक पाळी कधीही दुर्लक्षित करू नये.
गिळण्यात अडचण
सतत अपचन किंवा अन्न गिळताना अडचण येणं ही अन्ननलिका, पोट किंवा घशाच्या कर्करोगाची लक्षणं असू शकतात.
कफ किंवा रक्तस्राव असलेला खोकला
सतत खोकला येणे, विशेषतः रक्तमिश्रित कफ येणे हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
अचानक गाठी निर्माण होणे
शरीराच्या कोणत्याही भागात गाठ किंवा फोड जाणवणे आणि तो मोठा होत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
त्वचेवर होणारे बदल
त्वचेच्या कर्करोगाव्यतिरिक्त त्वचेत काही बदल होतात, जसे की त्वचा गडद होणे, डोळे आणि त्वचा पिवळी होणे, त्वचेवर लालसरपणा येणे, खाज सुटणे आणि केसांची जास्त वाढ होणे.
मल किंवा लघवीमध्ये बदल
लघवी करताना वेदना होणे, रक्त दिसणे किंवा शौचाच्या सवयी अचानक बदलणे हे पोटाच्या कर्करोगाचे संकेत असू शकतात.
तीव्र वेदना किंवा हाडांमध्ये कमकुवतपणा
हाडांचे ठिसूळ होणे, सतत वेदना होणे आणि कोणताही दृष्टीस पडणारा स्पष्ट कारण नसतानाही अस्वस्थता जाणवणे कर्करोगाचे संकेत असू शकतात.
डॉक्टरांचा सल्लाजर तुम्हाला वरीलपैकी कोणतीही लक्षण दीर्घकाळ दिसून येत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदान आणि योग्य उपचाराने कर्करोगावर नियंत्रण मिळवणे शक्य आहे.
कर्करोग टाळण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय
तंबाखू आणि मद्यसेवन टाळा
संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करा
पुरेशी घ्या आणि तणाव टाळा
वार्षिक आरोग्य तपासणी करून घ्या