मुंबई : मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महापालिकेच्या दमदार कामगिरीबद्दल माहिती दिली. महापालिकेच्या महसुली उत्पन्नात वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली. विकास नियोजन शुल्क, अग्निशमन दल आणि जकातीपोटी येणारी भरपाई यात वाढ झाल्यानं महापालिकेच्या महसुली उत्पन्नात 7410 कोटी रुपयांची वाढ प्रस्तावित करण्यात आलेली आहे,अशी माहिती आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली.
मुंबई महापालिका कडून असणाऱ्या मुंबईकरांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पतून प्रतिबिंबित झाल्या आहेत. 2025-26 चा अर्थसंकल्प 74427 कोटींचा आहे. हा मुंबई महापालिकेच्या इतिहासातील आतापर्यंत मोठी वाढ असलेला अर्थसंकल्प आहे. भांडवली आणि महसुली हे अर्थसंकल्पाचे दोन भाग असतात. भांडवली अर्थसंकल्प 43162 कोटी रुपये आहे म्हणजे आकारमानाच्या 58 टक्के अर्थसंकल्प भांडवली आहे. याच्यावरुन स्पष्ट होतं की महापालिकेनं गेल्या काही वर्षात महसुली खर्चावर नियंत्रण मिळवलं आहे. भांडवली अर्थसकंल्प 58 आणि महसुली अर्थसंकल्प 42 टक्के आहे. मालमत्ता, जल व मलनि:सारणावर कर, जकातीऐवजी शासनाकडून मिळणारे उत्पन्न हे या वर्षीच्या महसुली उत्पन्नातील प्रमुख स्त्रोत आहे, असं भूषण गगराणी म्हणाले.
मुंबई महापालिकेनं सर्व बँकांकडून पारदर्शकपद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं व्याजाचे दर मागवण्याची प्रक्रिया सुरु केली. यामुळं आम्हाला मिळणाऱ्या व्याजाच्या टक्केवारीत अर्धा टक्का वाढ झाली आहे. मालमत्ता करात कोणतीही वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही. जल आणि मलनि:सारणावर कोणतीही वाढ लागू करण्यात आलेली नाही.
2017 पासून मुंबई महापालिकेनं जे प्रयत्न केले त्यामुळं महसुली खर्च 75 टक्यांवरुन 42 टक्क्यांवर खाली आला तर भांडवली खर्च 25 टक्क्यांवरुन 58 टक्क्यांवर पोहोचला आहे. या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या उपाययोजना महापालिकेनं घेतल्या, त्यामुळं महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
प्रीमियम FSI ची विभागणी 4 संस्थांमध्ये केली जाते. धारावी प्राधिकरण 25 टक्के, महापालिका 25 टक्के, एम एस आर डी सी 25%, राज्य सरकार २५ टक्के यांच्यात विभागला जातो. आता धारावी प्राधिकरणाला 25 % गरज नाही कारण ते स्वतंत्र झाले आहेत. हा FSI मुंबई महापालिकेकडे वर्ग होईल. मुंबई महापालिकेकडे 50 टक्के एसएफआय येईल. त्यातून महापालिकेला 300 कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळेल, असं भूषण गगराणी म्हणाले. रिक्त भूभाग भाडेपट्टा हे धोरण पुढं जात नव्हतं, आता ते आम्ही मान्य केलं आहे. त्यामुळं मुंबई महापालिकेला येत्या चार वर्षात चार हजार कोटी अतिरिक्त मिळण्याची शक्यता आहे.
झोपडपट्टीत ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत, त्याचा सर्व्हे सुरु केला आहे. 2025-26 मध्ये अतिरिक्त 300 कोटींचा महसूल महापालिकेला मिळेल, असं अपेक्षित असल्याचं भूषण गगराणी यांनी सांगितलं.
घनकचरा व्यवस्थापन शुल्क म्हणजेच कचरा संकलन कर लावण्या संदर्भात कायदेशीर सल्ला घेतला जात आहे. टप्प्याटप्प्याने हा कर लावण्याचा मानस आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मुंबईत रस्त्याच्या खड्यांची समस्या होती अजूनही आहे. 1333 किमी रस्त्याचं काँक्रिटीकरण केलं आहे. अजूनही टप्पा दोन चा काम सुरु आहे. 31 मे 2025 पर्यंतचे जे रस्ते शंभर टक्के पूर्ण होतील, तेच रस्ते खोदून ठेवावेत अशा सूचना आम्ही केल्या आहेत.अनेक रस्त्यांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत आणि त्या रस्त्यांच्या तक्रारीसाठी मुंबई आयआयटीची नेमणूक करण्यात आली आहे. काही स्थानिक लोकांना काँक्रिटीकरण नको असेल तर त्यांच्या निवेदनाचा सुद्धा विचार करू असं भूषण गगराणी म्हणाले.एक्सेस कंट्रोल प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहन व्यवस्था करण्यात येत आहे. वाहन पार्क करण्यासाठी 200 ते 500 मीटर अंतरात गाडी लावता येईल.राज्य शासनाकडून येणारा परतावा 4700 कोटी महापालिकेला मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
कोस्टल रोडचा उत्तरेकडचा भाग वर्सोवा दहिसर भायंदर मार्ग याचं सुद्धा काम लवकरच सुरु होईल. सर्व परवानग्या यामध्ये मिळतील. गोरेगाव मुलुंड लिंक रोड चा काम सुद्धा सुरु आहे. 43 हजार कोटीच्या भांडवली खर्चात विशेष तरतूद या प्रकल्पसाठी करण्यात आली आहे त्यामुळे निधी अभावी कुठलेही काम थांबणार नाही. काही पुलांचं काम सुरु आहे, गोखले ब्रिज काम मे पर्यत पूर्ण होईल आणि पूर्ण वापरासाठी तयार होईल. कर्नाक ब्रिज चा काम सुद्धा लवकर पूर्ण होईल, असं भूषण गगराणी म्हणाले.
सांडपाणी प्रकल्प पूर्ण झाल्यावर नॉन ड्रीकिंग वॉटर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होईल. मुंबईच्या पाणीसाठ्या मध्ये मोठी सुधारणा होऊ शकते. मुंबईत अनेक ठिकाणी प्रकल्प होतात त्यात 32782 प्रकल्पग्रस्ताना घरे द्यायची आहे त्यासाठी PAP प्रोजेक्ट राबवले जात आहे. 74 हजार कोटी बजेट पैकी 10 टक्के बजेट आरोग्य खात्यासाठी वापरणार आहोत.97 सुपर स्पेशलीटी बेड मुंबईत उपलब्ध होतील. मानके आहेत त्यानुसार दोन कोटी मुंबई महापालिकेची लोकसंख्या असताना मानकानुसार जास्त रुग्णशय्या मुंबईत उपलब्ध आहेत, असं भूषण गगराणी म्हणाले.
इतर बातम्या :
अधिक पाहा..