आता एटीएममधून पैसे काढणंही महागणार? आरबीआय मोठ्या निर्णयाच्या तयारीत, खातेदारांना आणखी एक धक्का
Marathi February 05, 2025 06:25 PM

एटीएम रोख पैसे काढणे: एटीएम कार्डचा वापर करुन खात्यातून पैसे काढणं महागण्याची शक्यता आहे. एटीएमचा वापर करुन पाचवेळा पैसे काढणं मोफतं आहे. त्यानंतरच्या व्यवहारांवर लागणारं शुल्क आणि एटीएम इंटरचेंजचं शुल्क वाढवण्याच्या तयारीत आरबीआय असल्याची माहिती आहे. हिंदू बिझनेस लाईनच्या रिपोर्टनुसार मंगळावारी यासंदर्भात माहिती देण्यात आली. म्हणजेच बँक खातेदारांना एटीएममधून पैसे काढल्यास अतिरिक्त पैसे मोजावे लागतील.

शुल्क किती वाढणार?

प्रस्तावित शुल्क किती वाटेल यासंदर्भातील माहिती देखील मसोर आली आहे. भारतीय राष्ट्रीय पेमेंटस कॉर्पोरेशननं पाच मोफत व्यवहारांची मर्यादा ओलांडल्यानंतर जे शुल्क आकारलं जातं ते 21 रुपयांवरुन 22 रुपये करण्याची शिफारस केली आहे. एनपीसीआयनं या क्षेत्रातील स्टेक होल्डर्स सोबत चर्चा केल्यानंतर एटीएम इंटरचेंज फी 17 रुपयांवरुन 19 रुपये करण्याची शिफारस केली आहे.

इंटरचेंज फी एखाद्या खातेदारानं दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून विशिष्ट मर्यादेपेक्षा अधिकवेळा रक्कम काढल्यास आकारलं जातं.एटीएम सेवा वापरल्यानंतर एका बँकेकडून दुसऱ्या बँकेला दिली जाणारी रक्कम आहे. एटीएममधून पैसे काढल्यानंतरच्या बिलावर देखील त्याचा उल्लेख असतो.

रिपोर्टनुसार बँक आणि व्हाइट- लेबल एटीएम ऑपरेटर मेट्रो आणि नॉन मेट्रो भागातील फीच्या वाढीसाठी एनपीसीआयच्या प्रस्तावाशी सहमत आहेत. मात्र, आरबीआय आणि एनपीसीआयनं या बाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

या संदर्भातील एका जाणकार व्यक्तीच्या दुजोऱ्यानं  स्पष्ट करण्यात आलं की, आरबीआयनं आयबीएच्या सीईओच्या अध्यक्षतेखाली एक दुसरी समिती बनवली आहे. यामध्ये एसबीआय आणि एचडीएफसी बँकेचे अधिकारी होते.

खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खर्चाचा आढावा घेतल्यानंतर गेल्या सप्टेंबरमध्ये  यासंदर्भातील शिफारस केली होती. यानंतर एनपीसीआयच्या शिफारशीला मेट्रो सेक्टर्स साठी लागू केली जाऊ शकते. मात्र, खरा प्रश्न ग्रामीण आणि निमशहरी भागातील आहे.

एटीएम चालवण्याच्या खर्चात वाढ

रिपोर्टनुसार वाढती महागाई आणि गेल्या दोन वर्षातील वाहतुकीचा वाढता खर्च, रोख रकमेची प्रतिपूर्ती  आणि इतर कारणांमुळं नॉन मेट्रो शहरं आणि ग्रामीण भागात एटीएम चालवण्याचा खर्च वाढत असल्याची माहिती आहे.

इतर बातम्या :

Asian Paints : तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला, एशियन पेंट्सचा नफा दुप्पट, शेअरमध्ये एका गोष्टीमुळं घसरला,शेअरधारकांकडून विक्री सुरु

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.