Tribal Land Scam: बडोदा जेएनपीटी महामार्गाच्या भूसंपादनात फसवणूक, ७४ लाख दुसऱ्या खात्यात वळवले, महायुतीच्या नेत्यांचा प्रताप
Saam TV February 06, 2025 12:45 AM

बडोदा जेएनपीटी महामार्गाच्या भूसंपादनात आदिवासींची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी बदलापूर पोलिसांनी आरोपींवर कारवाई करत ४ जणांवर गुन्हा दाखल केलाय. यामध्ये शिवसेना शिंदे गटात असलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात असलेले नेरळचे माजी सरपंच भगवान चंचे यांचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे.

भागातून जाणाऱ्या बडोदा जेएनपीटी महामार्गासाठी काही वर्षांपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली होती. या भूसंपादनात १० आदिवासी जागामालकांच्या बँक खात्यात आलेले ७४ लाख ५० हजार रुपये या आरोपींनी परस्पर स्वतःच्या आणि निकटवर्तीयांच्या खात्यात वळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

प्रकरण उघडकीस आल्यानंतर बदलापूर ग्रामीण आरोपींवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, नेरळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भगवान चंचे, संजय गिरी आणि समीर वेहळे या चौघांना अटक करण्यात आली आहे. तसेच आणखी ५,६ आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय गोविंद पाटील यांनी दिली आहे.

या फसवणूक प्रकरणात थेट सत्ताधारी पक्षात असलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि माजी सरपंचांनाच अटक झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये काही तत्कालीन सरकारी अधिकार्यांचाही सहभाग होता का? याचा देखील तपास पोलीस करीत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.