Wedding Viral Video: लग्न म्हणजे तरुण-तरुणीच्या आयुष्यातील खास दिवस असतात.नवरी-नवरदेव लग्नातील प्रत्येक क्षण उत्साहात जगून घेत असतात.मग लग्नातील डान्स असो वा कोणताही विधीमधे आनंदाने सहभाग दाखवतात.सध्या अशाच एका नवरीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे,ज्यात नवरी वरातीत घोड्यावर बसून धम्माकेदार डान्स करते.
(Viral)होत असलेल्या व्हिडिओत वरानिमित्ताने सर्व मंडळी जमलेली दिसत आहेत.त्यामध्ये तुम्हाला नवरी सुंदर साडी नेसून डोक्यावर फेडा घालून घोड्यावर बसलेली आहे.नवरी मुलगी घोड्यावर बसल्यानंतर गाणी सुरु होतात.गाणी सुरु झाल्यानंतर गाणयाच्या तालावर घोड्याला नाचवण्यात येते.मग त्यानंतर नवरीही डान्स करण्यास सुरुवात करते.नवरीच्या चेहऱ्यावर उत्साह पाहून तेथील सर्व मंडळी तिला डान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.
व्हिडिओ सध्या 'samadhan_eshwar_bhosale' या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होताच लाखोंच्या संख्येने व्हिडिओला व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेक लाईक्स व्हिडिओ पाहून आलेले आहेत.व्हिडिओ नक्की कुठल्या ठिकाणावरील आहे हे समजू शकलेले नाही,मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.
नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रियानवरी बाईचा (Video) नेटकरी वर्गाच मोठ्या प्रमाणात चर्चेत आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर बऱ्याच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे की,''नाद लागतो....कोणाच पण काम नाय....छान''तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''नवरी शेतकऱ्यांचि कन्या आसेल म्हणून घोड्यावर बसून डान्स करते'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.