Supreme Court of India Recruitment 2025: सुप्रीम कोर्टात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया (SCI) ने जूनियर कोर्ट असिस्टंटच्या पदासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
5 फेब्रुवारीपासून अधिकृत वेबसाइट वर अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. व अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2025 आहे. सुप्रीम कोर्टात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी काय प्रक्रिया आहे? आणि पगार किती मिळेल? संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
योग्यतासुप्रीम कोर्टात जूनियर कोर्ट असिस्टंट पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवारांना संगणकावर इंग्रजी टायपिंगची स्पीड 35 शब्द प्रति मिनिट असावी.
तसेच संगणक ऑपरेशन्सची माहिती असणे देखील आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ऑनलाइन पाहू शकतात.
वयोमर्यादासुप्रीम कोर्टाच्या या भरतीसाठी उमेदवारांची किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 30 वर्षे निश्चित केले आहे. वयाची गणना अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 मार्च 2025 च्या आधारावर केली जाईल. याशिवाय, आरक्षित वर्गासाठी वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
पगारजूनियर कोर्ट असिस्टंट पदावर निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 रुपये प्रति महिना बेसिक वेतन मिळेल. वेतन भत्ते आणि इतर अलाउन्सेस मिळाल्यावर एकूण पगार 72,040 रुपये प्रति महिना होऊ शकतो.
निवड प्रक्रियाउमेदवारांची निवड लेखी परीक्षा, टायपिंग टेस्ट आणि दस्तऐवज पडताळणीसह इतर आवश्यक टप्प्यांद्वारे केली जाईल.
अर्ज शुल्कसुप्रीम कोर्टाच्या या भरतीसाठी सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल, तर एससी/एसटी/पीएच उमेदवारांना 250 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
परीक्षा पद्धतसुप्रीम कोर्टाच्या जूनियर कोर्ट असिस्टंटच्या लेखी परीक्षेत 100 बहुपर्यायी प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 2 तासांचा असेल. या परीक्षेत जनरल इंग्रिश, जनरल नॉलेज आणि जनरल अॅप्टिट्यूड विषयावर प्रश्न विचारले जातील. त्याचप्रमाणे, 25 प्रश्न संगणक ज्ञानावर आधारित असतील. इंग्रजी टायपिंग टेस्टही 10 मिनिटांची स्वतंत्र परीक्षा असेल.
तरी तुम्ही अधिक माहिती किंवा संबंधित अपडेटसाठी सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.