Latest Bollywood News: बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. मात्र या त्याच्या नवीन चित्रपटाच्या चर्चा नाहीयेत. तर आमिर पुन्हा एकदा प्रेमात पडलाय. हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. आमिर सध्या ५९ वर्षाचा आहे. काही वर्षांपूर्वी आमिर 'दंगल' फेम अभिनेत्रीला डेट करत असल्याचं बोललं जात होतं. मात्र त्या निव्वळ अफवा होत्या. आता वयाच्या ५९ व्या वर्षी आमिरला त्याचं नवं प्रेम मिळालंय असं सांगण्यात येतंय. आता त्या व्यक्तीचं नावही समोर आलंय .
आमिरच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाची एंट्री झालीये. असं म्हटलं जातंय की तो बेंगळुरूमधील एका महिलेला डेट करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमिरने तिची त्याच्या कुटुंबाशी ओळख करून दिली आहे आणि ही भेट चांगली झाली. तो या नात्याबद्दल खूप गंभीर असल्याचं दिसतं, म्हणूनच त्याने त्याच्या कुटुंबालाचीही भेट करून दिली. आता त्या महिलेचं नाव समोर आलंय. त्या महिलेचं नाव गौरी आहे आणि तिचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाहीये.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव गौरी आहे आणि ती बेंगळुरूमध्ये राहते. तसेच तिचा बॉलिवूडशी काहीही संबंध नाही. पण आमिरने त्याचं नवीन नातं खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि याबद्दल कोणतंही अधिकृत विधान केलेलं नाही. पण जर अफवा खऱ्या असतील तर त्याच्या आयुष्यातील हा नवा अध्याय त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करणारा आहे.
आमिर खानची आधीची दोन लग्नने १९८६ मध्ये रीना दत्तासोबत लग्न केलं आणि त्यांना दोन मुलं झाली- एक मुलगा जुनैद खान आणि एक मुलगी आयरा खान. हे नातं फार टिकलं नाही आणि डिसेंबर २००२ मध्ये तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. दोन्ही मुलांचा ताबा रीना दत्ता यांना मिळाला. काही वर्षांनंतर, आमिरने २००५ मध्ये चित्रपट निर्मात्या किरण रावशी लग्न केले आणि २०११ मध्ये त्यांना मुलगा आझाद झाला. दुर्दैवाने, २०२१ मध्ये आमिर आणि किरण यांनीही वेगळे होण्याची घोषणा केली.