Oral Cancers Symptoms: 'ही' आहेत तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे; याकडे दुर्लक्ष करणे पडेल महागात
Idiva February 06, 2025 11:45 PM

आजकाल कर्करोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. असे पाहिला गेले तर १० पैकी दोन ते तीन जण हे कर्करोगाचे बळी पडत आहेत. सातत्याने कर्करोगाने अनेकांचा मृत्यू होत असल्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगानंतर बहुतेक लोक तोंडाच्या कर्करोगाला बळी पडताना दिसत आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे धुम्रपान आणि तंबाखूचे सेवन. यामुळे तोंडाच्या कर्करोगामध्ये वाढ होताना दिसत आहे. ओठ, हिरड्या, जीभ, गालाचे आतील स्तर, तोंडाचा वरचा भाग आणि तोंडाचा आतील भाग याठिकाणी कर्करोग होताना दिसत आहे. हा रोग इतका फोफावला आहे की, याची सुरुवातीची लक्षणे आपल्याला दिसत नाही. आपण, त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु, आपल्याला तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आधीच जाणवतात. परंतु, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. अशी कोणती लक्षणे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे आपल्याला महागात पडू शकते, ते जाणून घेऊया.

हेही वाचा : मुंबईतील अशी ५ उद्याने आणि समुद्रकिनारे जिथे भेट दिलीच पाहिजे

iStock

लवकरात लवकर तपासणी करणे आवश्यक

तोंडाचा कर्करोग हा भारतातील सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. गेल्या 10 वर्षांत तोंडाच्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये एक तृतीयांशपेक्षा जास्त वाढ झाली आहे. हा कर्करोग ओठ, हिरड्या, जीभ, गालांचे आतील अस्तर, तोंडाच्या वरच्या भागासह आणि जीभेखालील तोंडाच्या कोणत्याही भागात विकसित होऊ शकतो. हा भयंकर आजार टाळण्यासाठी त्याची लक्षणे जाणून घेणे आणि त्याची लवकरात लवकर तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे. 


हे आहे प्रमुख कारण

तोंडाच्या कर्करोगाची अनेक कारणे आहेत. एका संशोधनानुसार, तंबाखूचे सेवन करणे हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण ठरत आहे. यासोबतच गुटखा, सिगारेट, बिडी, हुक्का या सर्व गोष्टींचा तंबाखूमध्ये समावेश होतो. जे ट्यूमरचे प्रमुख कारण आहे. महत्त्वाचे म्हणजे तरुण आणि वृद्ध लोक त्याला बळी पडत आहेत. तोंडाचा कर्करोग सुरुवातीला काही लक्षणे दाखवतो. परंतु, आपण त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. अशी कोणती लक्षणे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. 

हेही वाचा : मासिक पाळीसोबत महिलांमध्ये गर्भधारणा होण्याची शक्यताही बदलते

पांढरे ठिपके

हिरड्या, जीभ, टॉन्सिल किंवा तोंडावर लाल किंवा पांढरे जाड ठिपके दिसणे धोकादायक असू शकते. या स्थितीला ल्युकोप्लाकिया म्हणतात. बहुतेक ल्युकोप्लाकिया पॅचेस कर्करोग नसलेले असतात. अनेक कर्करोगांची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. हे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होऊ शकतात. जर कोणाला अशी चिन्हे दिसली तर उशीर न करता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.   

istock

गाठ जाणवते

जर तुम्हाला तोंडात किंवा लसिका ग्रंथी (गळ्यातील लसिका ग्रंथी) मध्ये कोणत्याही प्रकारची गाठ जाणवत असेल तर ते धोकादायक असू शकते. तुमच्या घशात काहीतरी अडकले आहे किंवा घसा दुखत आहे, असे सतत जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

iStock


तोंडाला वेदना होणे किंवा बधीरपणा येणे

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर, तोंडाच्या किंवा मानेभोवती कोणत्याही कारणाशिवाय वेदना आणि बधीरपणा जाणवत असेल तर ते तोंडाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते. या स्थितीत, जबड्यात सूज आणि वेदना देखील असू शकतात.

हेही वाचा : आयुर्वेदानुसार PCOS रुग्णांनी अंगिकारल्या पाहिजेत 'या' खाण्याच्या सवयी


istock

दात पडणे

कोणत्याही कारणाशिवाय एक किंवा अधिक दात कमकुवत होणे आणि पडणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. याशिवाय जर तुम्ही दात काढला असेल आणि त्या जागेवरचा खड्डा भरत नसेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तोंडाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपी यासह अनेक मार्गांनी उपचार केले जातात. हे व्यक्तीचे वय, आरोग्य स्थिती आणि अवस्था यावर अवलंबून असते. 

हेही वाचा :  'हे' घरगुती उपाय तुम्हाला मासिक पाळीच्या समस्येपासून मुक्त होण्यास करतात मदत


© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.