ओला इलेक्ट्रिक कंपनीने काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या नवीनतम थर्ड जनरेशन इलेक्ट्रिक बाईक्स लाँच केल्यानंतर आता भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठीOla Roadster X आणि Ola Roadster X Plus या त्यांच्या पहिल्या इलेक्ट्रिक बाईक लाँच केल्या आहेत. ज्या 74,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आल्या आहेत. ओलाची सर्व ग्राहकांना परवडणारी सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक असून ज्याचा स्पोर्टी लूक आणि बॅटरीच्या विविध पर्यायांसह खरेदी करता येणार आहे.
भारतात Ola Roadster Xची किंमत
ओलाची ही इलेक्ट्रिक बाईक 2.5 किलोवॅट व्हेरिएंट असलेल्या बाईकची (एक्स-शोरूम) किंमत 74,999 रुपये आहे. तर 3.5 किलोवॉट व्हेरिएंट असलेल्या बाईकची (एक्स-शोरूम) किंमत 84,999 रुपये इतकी आहे आणि 4.5 किलोवॉट व्हेरिएंट असलेल्या बाईकची (एक्स-शोरूम) किंमत 94,999 रुपये सह लाँच करण्यात आली आहे.
Ola Roadster Xची रेंज
ओलाची 2.5 किलोवॅट व्हेरिएंट असलेली Ola Roadster X ही बाईक फुल चार्जवर 117 किलोमीटरपर्यंत रेंज देते. तर 3.5 किलोवॅट व्हेरिएंट असलेली बाईक सिंगल चार्जवर 159 किलोमीटरपर्यंत रेंज देते. तसेच 4.5 किलोवॅट व्हेरिएंट असलेली टॉपचे मॉडेल सिंगल चार्जवर 252 किलोमीटरपर्यंत रेंज प्रदान करते. Ola Roadster Xची ही बाईक 3.2 सेकंदात 0 ते 40 चा वेग पकडू शकते, असा दावा कंपनीकडून केला जात आहे.
Ola Roadster X या इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जिंग वेळेबद्दल बोलायचे झाले तर, 2.5 किलोवॅट व्हेरिएंट असलेली बाईकची बॅटरी चार्जिंग 3.3 तास, तर 3.5 किलोवॅट व्हेरिएंटला 4.6 तास आणि 4.5 किलोवॅट च्या टॉप मॉडेलला पूर्ण चार्ज होण्यास 5.9 तास लागतात.
भारतात Ola Roadster X Plusची किंमत
ओलाची Ola Roadster X Plus ही बाईक 4.5 किलोवॉट आणि 9.1 किलोवॉट या दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. तर 4.5 किलोवॉट व्हेरिएंटची किंमत 1,04,999 रुपये (एक्स-शोरूम)इतकी आहे. तसेच 9.1 किलोवॉट व्हेरिएंटची किंमत 1,54,999 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. या बाईक सुरुवातीच्या इंटरोडक्टरी किंमतीत लाँच करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा की इंटरोडक्टरी किंमती केवळ 7 दिवसांसाठी वैध असणार आहे.
Ola Roadster X Plusची रेंज
या इलेक्ट्रिक बाईकचे ९.१ किलोवॅट असलेल्या बॅटरीचे व्हेरियंट फुल चार्जवर 501 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल. या बाईकचा टॉप स्पीड 125 किमी प्रति तास असून 2.7 सेकंदात ही बाईक 0 ते 40 पर्यंत वेग पकडते.
बुकिंग आणि डिलिव्हरी डिटेल्स
कंपनीच्या साइटवर किंवा ओला इलेक्ट्रिक डीलरमार्फत ९९९ रुपयांची बुकिंग रक्कम भरून तुम्ही या बाईक बुक करू शकता. मीडिया रिपोर्ट्सनुसार या बाइक्सची डिलिव्हरी पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.