नवीन शैक्षणिक वर्ष 2025 मध्ये पालकांना शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूल बससाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत. कारण वाढत्या इंधन, बसच्या देखभाली खर्चाच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस मालकांनी शालेय बस शुल्कात 18 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राज्य सरकारने सरकारी बस भाड्यात 14.95 टक्के वाढ जाहीर केली आहे. त्यामुळे आता पालकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
Ganesh Naik : ठाणे आपल्या सगळ्यांचंच आहे - गणेश नाईकराज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख मंत्री म्हणून नेमणूक होताच महायुतीतील सगळे मंत्री कुठेही दरबार घेऊ शकतात असं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, "मी पालघरचा पालकमंत्री आहे. प्रश्न असा आहे की जनता दरबार कोणी कुठेही घेऊ शकतो. महायुतीच्या सगळ्याच मंत्र्यांनी जिथे पाहिजे तिथे दरबार घ्यावा." तसंच ठाणे हे आपल्या सगळ्यांचं आहे. ठाण्यात काय अडीअडचणी आल्या तर संबंधित अधिकाऱ्यांना देखील आपण बोलू, असंही ते म्हणाले आहेत.