जेके सिमेंट, Reliance, इंडसइंड बँकेसह या शेअर्समध्ये अल्पावधीत मजबूत परताव्याचा अंदाज; तज्ज्ञांनी सूचवली लक्ष्य किंमत
मुंबई : आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत घडामोडींच्या आधारावर शेअर बाजारात चढ उतार होत असते. बाजाराच्या मोठ्या चढ-उतारातही विशिष्ट घडामोडींच्या आधारावर शेअर्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला बाजार तज्ज्ञांनी दिला आहे. हे शेअर्स अल्पकालावधीच्या गुंतवणुकीत दमदार परतावा देऊ शकतात. या यादीत एल अँड टी टेक्नॉलॉजी, जेके सिमेंट, रिलायन्स, इंडसइंड बँक, आयईएक्स, एमसीएक्स या शेअर्सचा सामावेश आहे. एल अँड टी टेक्नॉलॉजीशेअर बाजार तज्ज्ञ जयेश भानुशाली (सिनिअर डेरिव्हेटिव्ह अँड टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट) यांनी L&T Technology शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 5,840 रुपये असून 5,450 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 5,555 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे. जेके सिमेंटशेअर बाजार तज्ज्ञ जयेश भानुशाली (सिनिअर डेरिव्हेटिव्ह अँड टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट) यांनी JK Cement शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 5,120 रुपये असून 4,760 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 4,865 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे. एमसीएक्सशेअर बाजार तज्ज्ञ जयेश भानुशाली (सिनिअर डेरिव्हेटिव्ह अँड टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट) यांनी MCX शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 6,360 रुपये असून 5,930 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 6,105 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे. रिलायन्सशेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेरानी ( टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट) यांनी Reliance शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 1,350 रुपये असून 1,250 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 1,278 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे. इंडसइंड बँकशेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेरानी ( टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट) यांनी IndusInd Bank शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 1,180 रुपये असून 1,030 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 1,071 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे. आयईएक्सशेअर बाजार तज्ज्ञ नुरेश मेरानी ( टेक्निकल रिसर्च अॅनालिस्ट) यांनी IEX शेअर्सची खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी प्रति शेअर लक्ष्य 195 रुपये असून 174 रुपयांचा स्टॉपलॉसही दिला आहे. सध्या हा शेअर 183 रुपयांच्या जवळपास ट्रेड करीत आहे.
(Disclaimer: ब्रोकरेज फर्म /तज्ज्ञांनी दिलेल्या शिफारसी, सूचना, मते आणि सल्ला ही त्यांची स्वतःची आहेत. हे 'इकॉनॉमिक टाइम्स मराठी'च्या मतांचे प्रतिनिधित्व करत नाहीत.)