Premachi Goshta : मुक्ताने सावनीसमोर स्वीकारलं नवं आव्हान ! तरीही प्रेक्षकांनी घेतली खलनायिकेही बाजू, म्हणाले..
esakal February 06, 2025 09:45 PM

Marathi Serial Update : स्टार प्रवाहवरील गेल्या काही काळापासून चर्चेत असणारी मालिका म्हणजे प्रेमाची गोष्ट. मुक्ता सागरची गोष्ट असणारी ही मालिका सध्या त्यातील नव्या एन्ट्रीमुळे चर्चेत आहे. तेजश्री प्रधानने ही मालिका सोडल्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री स्वरदा ठिगळेची एंट्री झाली आहे. पण प्रेक्षक तिच्या अभिनयाने खुश नाहीयेत. त्यातच नव्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

मालिकेत सध्या सईची कस्टडी मिळवण्यासाठी सावनीने आदित्यची कस्टडी सागरला दिल्याचं पाहायला मिळतंय. सई घर सोडून जाणार हे कळल्यावर मुक्ता हादरली आहे. त्यातच आता तिने सावनीला नवीन आव्हान दिलं आहे.

प्रोमोमध्ये पाहायला मिळत कि, सईला नेण्यासाठी सावनी पोलिसांबरोबर घरी येते. सईची ताटातूट होणार म्हणून मुक्ता हादरली आहे. सावनीकडे जायचं नाही म्हणून सई रडत असते. तेव्हा भावूक झालेली मुक्ता सईला स्वतःकडे खेचून घेते. चार दिवसात मी माझ्या मुलीची कायदेशीर कस्टडी मिळवीन असं आव्हान ती मुक्ताला देते.

मालिकेतील या ट्विस्टबद्दल प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. हा कस्टडीचा खेळ थांबवा अशी कमेंट एकाने केली. तर एकाने स्वरदा आता अभिनयात मागे पडतेय अशा अर्थाची कमेंट करत तेजश्रीला परत आणण्याची मागणी केली. तर एकाने स्वरदापेक्षा सावनीचा अभिनय बेस्ट आहेत. सावनी मुक्ताला वरचढ ठरतेय अशी कमेंट केली आहे.

मुक्ता सईची कस्टडी कशी मिळवणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. मालिकेचा हा भाग 11 फेब्रुवारीला पाहायला मिळेल. तेव्हा बघायला विसरू नका प्रेमाची गोष्ट सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.