दिलासादायक! शेतकऱ्यांना PM किसानचा 19 वा हप्ता ‘या’ दिवशी मिळणार, त्यापूर्वी करा ‘हे’ काम
Marathi February 07, 2025 12:24 AM

पंतप्रधान किसन सम्मन निधी योजना: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आत्तापर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यत जमा झाले आहेत. 19 वा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. दरम्यान, केंद्र सरकार फेब्रुवारीच्या अखेरीस पीम किसानचा 19 वा हप्ता जारी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि इतर विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी 24 फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळीच ते पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता वितरित करणार आहेत. .

त्वरित करा eKYC

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी, ई-केवायसी असणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑक्टोबर 2024 रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेचा 18 वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर येत्या 24 तारखेला PM किसानचा 19 हप्ता जारी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वर्षाला 6000 रुपयांची मदत दिली जाते

पीएम किसान ही केंद्र सरकारची योजना आहे. ज्याला भारत सरकार 100 टक्के वित्तपुरवठा करते. या अंतर्गत, हप्त्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. या योजनेंतर्गत, जमीनधारक शेतकरी कुटुंबाच्या (ज्यांच्या नावावर शेतजमीन आहे) आधार लिंक बँक खात्यात दर चार महिन्यांनी 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये 6000 रुपये वार्षिक पेमेंट केले जाते.

eKYC करणे का आवश्यक?

eKYC करणे आवश्यक आहे, जेणेकरून योजनेचा लाभ देशभरातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय पोहोचेल. त्यामुळं फसवणूक होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळं लवकरात लवकर eKYC करणे गरजेचं आहे.

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी eKYC च्या तीन पद्धती

1) ओटीपी आधारित ई-केवायसी (पीएम-किसान पोर्टल आणि मोबाइल ॲपवर उपलब्ध)
2)बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) आणि स्टेट सर्व्हिस सेंटर (एसएसके) येथे उपलब्ध आहे.
3) लाखो शेतकऱ्यांनी वापरलेले फेस ऑथेंटिकेशन-आधारित ई-केवायसी (पीएम किसान मोबाइल ॲपवर उपलब्ध)

पीएम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना आधार कार्ड, नागरिकत्व प्रमाणपत्र, जमिनीची मालकी दर्शवणारी कागदपत्रे, बँक खाते तपशीलांसह ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

सर्वप्रथम, पीएम-किसान पोर्टलवर जा आणि नोंदणी ऑनलाइन वर क्लिक करा.
तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSC) भेट द्या.
तुमच्या राज्य सरकारच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
स्थानिक पटवारी किंवा महसूल अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.