पुण्यातील एफसी रोडवरील १५ वर्षीय आरबाज अजहर शेख याची कहाणी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाळेत नववीत शिकणारा हा मुलगा दुपारी शाळेनंतर डस्टबिन बॅग विकून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करतो. त्याच्या या कष्टाळू वृत्तीमुळे आणि कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदारीमुळे अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
घरची परिस्थिती आणि आरबाजची जबाबदारीआरबाजचे वडील काही वर्षांपूर्वी निधन पावले, तेव्हा त्याची आई एकटीच कुटुंबाचा सांभाळ करत होती. आई हॉटेलमध्ये काम करून घर चालवते, परंतु आरबाजला आईची एकटीची मेहनत पाहून वाईट वाटत असे. त्यामुळे त्याने स्वतःहून डस्टबिन बॅग विकण्यास सुरुवात केली, जेणेकरून घरखर्चात हातभार लावता येईल.
शिक्षण आणि कामाचा समतोलप्रकाश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये नववीत शिकणारा आरबाज सकाळी शाळेत जातो आणि दुपारी दोन वाजता एफसी रोडवर डस्टबिन बॅग विकण्यासाठी उभा राहतो. रात्री १२ वाजता तो घरी जातो. पाच डस्टबिन बॅग्सची किंमत १०० रुपये असून, दिवसाला तो सुमारे दोन हजार रुपये कमावतो. त्याच्या म्हणण्यानुसार, "मी स्वतःहून मम्मीला म्हटलं, मम्मी म्हटली विकत जा, तेवढीच घरात मदत होईल."
इतिहासाची आवड आणि भविष्याची स्वप्नेइतिहास विषयात विशेष रुची असलेल्या आरबाजला लाल महाल, इतिहास आवडतो. भविष्यात तो आर्कियोलॉजिस्ट बनण्याचे स्वप्न पाहतो. शिवनेरी किल्ला, शनिवार वाडा, लाल महाल यांची माहिती त्याला आहे. त्याला चित्रकलेचीही आवड आहे आणि सोमवारी वेळ मिळाल्यास तो चित्रपट बघतो. शनिवार रविवार त्याच्या कामाचे दिवस असतात.
आरबाजच्या कुटुंबात तीन बहिणी आणि दोन भाऊ आहेत. लहान भाऊ १० वर्षांचा आहे, जो आईच्या पोटात असताना वडील वारले. आरबाज म्हणतो, "माझी प्रेरणास्थान मम्मीच आहे. मेहनत करून शिकलायचं मम्मीच सांगते." त्याच्या या शब्दांमधून त्याच्या आईबद्दलचा आदर आणि प्रेम स्पष्टपणे दिसून येते.
आरबाजची ही कहाणी तिखट मराठी यूट्यूब चॅनलने प्रकाशित केली असून, इनसाईड हिंदू या इंस्टाग्राम चॅनलवरही शेअर करण्यात आली आहे. त्याच्या या संघर्षमय जीवनप्रवासाने अनेकांना प्रेरणा मिळत आहे. आरबाजच्या कष्टाळू वृत्तीने आणि कुटुंबाप्रती असलेल्या जबाबदारीने समाजाला एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. त्याच्या या प्रेरणादायी प्रवासाला सलाम!