Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना कोर्टाचा दणका, करुणा शर्मांना द्यावी लागणार २ लाखांची पोटगी
Saam TV February 06, 2025 09:45 PM

राजकीय वर्तुळात एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. करूणा शर्मा यांचे आरोप वांद्रे कोर्टाने मान्य केले आहेत. करूणा शर्मा यांना महिन्याला खर्चासाठी पैसे देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्र्याच्या कौटुंबिक न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

यांच्याविरोधात करुणा मुंडे यांनी न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीमध्ये करुणा मुंडे यांनी अनेक आरोप केले होते. वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा मुंडे यांचे सर्व आरोप मान्य केले. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. त्याचसोबत न्यायालयाने करुणा मुंडे यांना दहमहा २ लाखांची पोटगी द्या असे आदेश धनंजय मुंडे यांना दिले आहेत.

न्यायालयाच्या निर्णयानंतर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'मी न्यायालयाचे आभार मानते. माझ्यासोबत माझी मुलं सुद्धा असल्याने आम्हाला १५ लाख रुपये दरमहा देण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने २ लाख रुपये दरमहा देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मी १५ लाख रुपयांची पोटगी मिळावी यासाठी उच्च न्यायालयामध्ये जाणार आहे.'

तसंच, 'माझा करून मुंडे असा उल्लेख करावा असे कोर्टाने म्हटले आहे. सेटलमेंट करा असे धनंजय मुंडे मला वारंवार बोलले. मी आत्महत्येचा विचार देखील केला होता. पण माझ्या कायम मनात मुलांचा विचार येतो.', असे देखील करुणा मुंडे यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.