टीम इंडियाने गुरुवारी 6 फेब्रुवारी रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. टीम इंडियाने इंग्लंडवर 4 विकेट्सने मात करत 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने या विजायसह 1-0 ने आघाडी घेतली. इंग्लंडने सुरुवातीला सामन्यावर चांगली पकड मिळवली होती. मात्र त्यांच्या फलदांजांना सातत्य कायम राखता आलं नाही. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर पराभवानंतर निराश झालेला दिसून आला. जोसने इंग्लंडच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या खेळाडूचं ऑन कॅमेरा नाव घेतलं. जोस नक्की काय म्हणाला? जाणून घेऊयात.
बटलरने पहिल्या सामन्यात इंग्लंडसाठी सर्वाधिक 52 धावांचं योगदान दिलं. मात्र इंग्लंडला विजय मिळवता येईल, एवढी मोठी खेळी बटलरला करता आली नाही. “मी जिंकू न शकल्याने निराश आहे. आम्ही पावरप्लेमध्ये चांगली सुरुवात केली, मात्र आम्ही विकेट्स गमावल्या. खेळपट्टी शेवटच्या क्षणी जशी खेळ दाखवत होती, त्या हिशोबाने 40-50 धावा आणखी मिळू शकल्या असत्या. खेळाडूंनी चांगली सुरुवात केली. तेव्हा आम्ही नियंत्रणात होतो, मात्र श्रेयस अय्यर याला त्या भागीदारीचं श्रेय जातं. आम्हाला टिकून चांगलं खेळावं लागेल”, असं जोसने म्हटलं.
इंग्लंडने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडला पूर्ण 50 ओव्हरही खेळता आलं नाही. इंग्लंडचा डाव 47.4 ओव्हरमध्ये 248 धावांवर आटोपला. टीम इंडियाने हे आव्हान तिघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 38.4 ओव्हरमध्ये सहज पूर्ण केलं. टीम इंडियासाठी उपकर्णधार शुबमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल या तिघांनी अनुक्रमे 87, 59 आणि 52 धावा केल्या.
जोस बटलर श्रेयस अय्यरबाबत म्हणाला…
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.