Maharashtra Political News Live : राहुल गांधी यांची दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद; खासदार राऊतांची माहिती
Sarkarnama February 07, 2025 04:45 PM
Sanjay Raut : राहुल गांधी यांची दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद, खासदार राऊतांची माहिती

राहुल गांधी आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. निवडणूक आयोगासह महाराष्ट्रातील अनेक देशातील विविध मुद्यांवर ते बोलतील, असे राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut : अतिरेक्यांप्रमाणे भारतीयांना अमेरिकेने परत पाठवलं; संजय राऊत यांचा घणाघात

अतिरेक्यांप्रमाणे भारतीयांना अमेरिकेने परत पाठवल्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेने पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी घणाघात केला. भारताची काय इज्जत आहे, अमेरिकेने दाखवून दिले. डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार आहे, त्यावेळी याबाबत विचारणा करणार आहे का?, असा सवाल केला.

Meghana Bordikar : महापारेषणमध्ये प्रकल्प तात्काळ मार्गी लावा; ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

महापारेषणचे विविध प्रकल्प तात्काळ मार्गी लावा. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करावे, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Chandrashekhar Bawankule : शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आदेश Chandrashekhar Bawankule 1

राज्यातील सर्वच शिव पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करा. त्यांची कामे दर्जेदाररीत्या पूर्ण करा, अशा सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देत शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश दिले आहेत.

RBI Repo Rate Cut : रिझर्व्ह बँकेचं पतधोरण आज होणार जाहीर

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आज पतधोरण जाहीर करणार आहे. आरबीआयची 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान पतधोरण विषयक बैठक सुरु आहे. त्यामुळे बँकेकडून रेपो रेटमध्ये 0.25% कपात करून तो 6.25 केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Shivsena Politics : ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात?

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ऑपरेशन टायगर करत अनेक नेत्यांना पक्षात घेण्यास सुरूवात केली आहे. अशातच आता उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Nagpur News : शिवाजी महाराजांची ऐतिहासिक वाघनखे आजपासून नागपुरकरांना पाहता येणार

छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखे आजपासून नागपूरकरांना पाहता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे. या प्रदर्शनात ऐतिहासिक वाघनखेही ठेवण्यात येणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.