दमदार मायलेज आणि परफॉर्मन्ससह 10 लाखापेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ‘या’ CNG कार
GH News February 07, 2025 07:11 PM

आपल्यापैकी अनेकजण पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती लक्षात घेता सीएनजी कार घेण्याकडे वळत आहे. तर दुसरीकडे सीएनजी कारचे अनेक फायदे आहेत. कारण सीएनजी कार या कमी खर्चात जास्त मायलेज देतात आणि कमी प्रदूषण निर्माण करतात. पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत सीएनजी कार हा चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर येथे आम्ही तुम्हाला 10 लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या सीएनजी कारबद्दल माहिती सांगणार आहोत. या कार उत्कृष्ट फीचर्ससह उत्तम मायलेज आणि परफॉर्मन्स देतात. मारुती स्विफ्ट, मारुती सुझुकी ऑल्टो के 10 आणि टाटा पंच सह त्यांचे डिझाइन आणि लूक खूपच क्लासी आहे.

Maruti Swift मध्ये सीएनजी मॉडेल

मारुती स्विफ्टमध्ये Z-सीरिज इंजिन आणि S-CNG चे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. तसेच मारुती स्विफ्ट ही कार 32.85 किलोमीटर प्रति किलो मायलेज देऊ शकते. तुम्हाला जर ही करा खरेदी करायची असेल तर या कारचे तीन सीएनजी व्हेरियंट बाजारात उपलब्ध आहेत.

मारुती स्विफ्टमध्ये मनोरंजनासाठी 17.78 सेंटीमीटर टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटी सपोर्टसाठी यात यूएसबी आणि ब्लूटूथ ची सुविधा देण्यात आली आहे. आता या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर याची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 8.19 लाख रुपये आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, मारुतीचे हे सीएनजी मॉडेल ३२.८५ किलोमीटर प्रति किलोमायलेज देते.

Tata Punch मध्ये सीएनजी मॉडेल

टाटा पंच ही बजेटमध्ये येणाऱ्या लोकप्रिय कारपैकी एक आहे. ही कार तुम्हाला पेट्रोल, इलेक्ट्रिक आणि सीएनजी असे तीन पर्यायात उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या गरजा आणि बजेटनुसार कार निवडू शकता. तसेच या कारच्या वेगवेगळ्या व्हेरियंटच्या किंमती वेगवेगळ्या असून टाटा पंच iCNG आयकॉनिक ALFA आर्किटेक्चरवर आधारित आहे. तसेच या कारमध्ये उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. या कारमध्ये iCNG किट देण्यात आले आहे, जे लीकपासून बचाव करते. या कारची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे कारमध्ये गॅस गळती झाल्यास हे iCNG तंत्रज्ञान आपोआप सीएनजी मोडवरून पेट्रोल मोडकडे वळते. टाटा पंचची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 7,22,900 रुपये आहे. ही कार 26.99 किलोमीटर प्रति किलो मायलेज देऊ शकते.

Maruti Suzuki Alto K10 मध्ये सीएनजी मॉडेल

ऑल्टो के10 या कारला भारतातील बहुतांश लोकांच्या पसंतीची आहे. तसेच ही कार बजेट फ्रेंडली पर्याय म्हणून मानली जाते. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 5 लाख 73 हजार रुपये आहे. तर ही कार 33.85 किलोमीटर प्रति किलो मायलेज देऊ शकते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.