टीव्ही9 नेटवर्क आणि रेड हॅट कम्युनिकेशनने दिल्लीत एक जबरदस्त ट्रॅव्हल फेस्टिव्हल आयोजित केला आहे. द वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझ्म फेस्टिव्हल नावाने या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 14 ते 16 फेब्रुवारीपर्यंत मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये हा सोहळा आयोजित केला जाणार आहे. हा एक असामान्य आणि संस्मरणीय असा फेस्टिव्हल असणार आहे. भारतीय पर्यटनाच्या सर्वात महत्त्वाच्या प्रदर्शनांपैकी एक असा हा फेस्टिव्हल असणार आहे. तसेच हा फेस्टिव्हल ट्रॅव्हल आणि टुरिझ्म इंडस्ट्रीच्या नव्या ट्रेंड्स आणि इनोव्हेशनवर प्रकाश टाकणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये तुम्ही कशाप्रकारे भाग घेऊ शकता हे जाणून घ्या. तसेच यावेळी काय काय खास आहे, त्याचीही माहिती जाणून घेणार आहोत.
या फेस्टिव्हलमध्ये भाग घेणारे लोक वेगवेळ्या सांस्कृतिक अनुभवांचा आनंद घेऊ शकणार आहेत. तसेच तंत्रज्ञानाच्या जगात दिवसे न् दिवस जे बदल होत आहेत, त्यावरही ते काम करू शकतात. त्याशिवाय या ठिकाणी मनोरंजन तर होणारच आहे. या कार्यक्रमाचा हेतू ट्रॅव्हल आणि पर्यटनाच्या एक्सपर्ट्स, फिरण्याची प्रचंड आवड असलेले लोक आणि त्याच्याशी संबंधित बिझनेसचे लोक एकाच मंचावर येणार आहेत. यामुळे भविष्यातील ट्रॅव्हल आणि टुरिझ्मला आकार मिळावा हा यामागचा हेतू आहे. नव्या इनोव्हेशनची माहिती सर्वांना झाली पाहिजे हाही त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. या कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांना नवीन ठिकाणं, तिथे पोहोचण्यात येणारे अडथळे दूर करण्याचे उपया आणि अनोखे अनुभव समजून घेता येणार आहेत.
हा फेस्टिव्हल अधिक सुंदर आणि आकर्षक करण्यासाठी हिंदी संगीत क्षेत्रातील महत्त्वाचं नाव या कार्यक्रमात जोडलं जाणार आहे. ते म्हणजे प्रसिद्ध गायक पॅपन. त्यांचा मंत्रमुग्ध करणारा आवाज प्रेक्षकांना ऐकता येणार आहे. व्हलेंटाईन डेच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी त्यांचा लाइव्ह शो होणार आहे. पॅपन हे फक्त बहुमुखी गायकच नाहीत, तर ते अव्वल दर्जाचे संगीतकार आणि कलाकारही आहेत. त्यांनी बॉलिवूड आणि ख्याल जगतात मोठं योगदान दिलं आहे. आपल्या सुमधूर आवाजाने ते लोकांना मंत्रमुग्ध करतात. लोकसंगीत हे त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्ये आहे. भारत आणि भारताबाहेरच्या संगीत प्रेमिंना ते नेहमीच प्रोत्साहन देत असतात. तरुणांमध्ये तर त्यांची प्रचंड क्रेझ आहे.
पॅपन यांचा कॉन्सर्ट 14 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता दिल्लीच्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये होईल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होणार आहे. यावेळी खाण्यापिण्याचीही प्रचंड रेलचेल असणार आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम, संगीत आणि प्रवास या जगतात आपल्या मित्रांनाही आणून त्यांचाही दिवस अविस्मरणीय ठरवू शकता. या कार्यक्रमाचे तिकीट BookMyShow.com वर उपलब्ध आहेत.