कॉर्पोरेट मंत्रालयात सरकारी नोकरीची मोठी संधी, परीक्षेशिवाय होणार निवड, कसा कराल अर्ज?
Marathi February 07, 2025 07:24 PM

कॉर्पोरेट मंत्रालयाच्या नोकर्‍या: एसरकारी नोकरीसाठी (Govt Job) प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं (Ministry of Corporate Affairs)  (MCA) नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. IEPF अधिकारांतर्गत सल्लागार पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार mca.gov.in वर 30 दिवसांच्या आत अर्ज करु शकतात.  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीत अर्ज सादर करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. .

भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (MCA) गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (IEPF) अंतर्गत सल्लागार पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती अंतर्गत, पात्र उमेदवारांना कॉर्पोरेट मंत्रालयाच्या अंतर्गत काम करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट mca.gov.in वर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. कॉर्पोरेट मंत्रालयाच्या या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या संधीचा लाभ घेऊ इच्छिणारा कोणताही उमेदवार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत आपला अर्ज सादर करू शकतात. या कालावधीनंतर पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, त्यामुळं उमेदवारांना अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कॉर्पोरेट मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या पात्रता अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे कमाल 63 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरीची मोठी संधी! BHEL मध्ये 400 पदांसाठी भरती प्रक्रिया, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.