दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यात आम आदमी पार्टी २० तर भाजप २५ मतदारसंघात आघाडीवर आहे. काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
Delhi Assembly Election Results LIVE : पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीने सुरुवातदिल्ली निवडणुकीच्या मतमोजणीला पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीने सुरुवात झाली असून सकाळी ८.३० वाजता ईव्हीएम उघडणार आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या, "ही सामान्य निवडणूक नव्हती तर चांगल्या आणि वाईटातील लढाई होती. मला विश्वास आहे की, दिल्लीचे लोक चांगल्या, आप आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत उभे राहतील. ते चौथ्यांदा मुख्यमंत्री होतील.."
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ परिसराच्या पूर्व आणि पश्चिम भागास जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे उद्घाटन आज, शनिवारी (ता. ८) सकाळी साडेदहा वाजता उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
B. S. Yediyurappa LIVE : 'पोक्सो'प्रकरणी माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना अटकपूर्व जामीन मंजूरबंगळूर : माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्याविरुद्धचा ‘पोक्सो’ खटला रद्द करण्यास नकार देणाऱ्या राज्य उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निकालामुळे येडियुराप्पा यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली येडियुराप्पा यांच्याविरुद्ध बंगळूरमधील सदाशिवनगर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
PM Modi LIVE : पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणारनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या बुधवारपासून (ता.१२) दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार असून, ते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत विविध द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा करतील. तत्पूर्वी ते फ्रान्सला देखील भेट देणार असून तिथे ते ‘एआय कृती संमेलना’मध्ये सहभागी होणार आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे देखील उपस्थित राहतील. पंतप्रधानांचा फ्रान्स दौरा सोमवारी (ता. १०) सुरू होतो आहे.
Delhi Assembly Election Results LIVE : दिल्लीचे 'दिल' कुणाला? आज निवडणुकीचा निकाल होणार जाहीरLatest Marathi Live Updates 8 February 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (ता.८) रोजी जाहीर होणार असून, मागील २८ वर्षांपासूनचा भाजपचा सत्तेचा वनवास संपणार की सलग चौथ्यांदा आम आदमी पक्ष विधानसभेवर कब्जा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याचा अंदाज आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या बुधवारपासून (ता.१२) दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार असून, ते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत विविध द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा करतील. मराठी साहित्य आणि वाङ्मय क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या साहित्यिकास देण्यात येणारा मानाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार (२०२४) ज्येष्ठ साहित्यिक रावसाहेब रंगराव बोराडे यांना जाहीर झाला आहे. त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी थंडीचा कडाका आहे तर, काही भागांत थंडी कमी झालेली दिसत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..