मराठी मनोरंजनसृष्टीतील विनोदवीर कुशल बद्रिके (Kushal Badrike) कायम त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. 'चला हवा येऊ द्या' या शोमुळे तो प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्याने आपल्या विनोदाने महाराष्ट्राला खळखळून हसवले आहे. कुशल बद्रिके सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. आपल्या आयुष्याचे अपडेट तो कायम चाहत्यांसोबत शेअर करतो. नुकतीच कुशलने एक खास पोस्ट केली आहे.
बद्रिकेच्या पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपल्या पोस्टमधूनही कुशल चाहत्यांना हसवत आहे. त्याने सोशल मीडियावर कुटुंबासोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट त्याने बायकोसाठी केली आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, कुशल बद्रिकेने स्वतः आपल्या बायकोचे सुंदर केले आहे. एक फोटोशूटसाठी घेतलेली मेहनत त्यांनी त्या व्हिडीओतून दाखवली आहे. एक clickसाठी कुशल तारेवरची कसरत करताना पाहायला मिळत आहे.
कुशल बद्रिके पोस्ट"माणसाला आयुष्यात सुखाचा क्षण वेचता आला नाही तरी चालेल पण बायकोने सांगितल्यावर तिचा छानसा फोटो मात्र खेचता आला पाहिजे. सुखाचा संसार हा आपल्या नशिबात असला तरी click होईलच असं नाही. ते बऱ्याचदा camera मधे केलेल्या click वर सुद्धा depend करतं. मला छान फोटो काढायला जमतील हा शोध माझ्या लावलाय . ह्या वरून असे सिद्ध होते की बऱ्याचदा "भीती" सुद्धा शोधाची जननी असू शकते आणि ह्या निकषावर माझ्या मुलाचा संसार सुद्धा छान होईल असा फोटो माझ्या डोळ्यासमोर उभा राहतोय!"
कुशल बद्रिकेने व्हिडीओ पोस्ट करून त्याला एक हटके कॅप्शन दिलं आहे. कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस पडत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या शेवटी मात्र कुशल बायकोचे सुंदर फोटो काढल्याचे दिसून येत आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये मजा मस्ती पाहायला मिळत आहे. फोटोशूटसाठी कुशल बद्रिकेच्या बायकोने छान गाऊन परिधान केला होता.