सॅम कोनस्टासला अर्ध्या दौऱ्यातून घरी पाठवलं! श्रीलंकेतून परतल्यानंतर दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाला…
GH News February 08, 2025 08:09 PM

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला असून 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यावरही ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. दुसरा कसोटी सामना गॉल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघात एक उलथापालथ झाली. संघात असलेल्या युवा ओपनिंग फलंदाज सॅम कोनस्टासला पुन्हा घरी पाठवून दिलं. इतकंच काय तर सॅम कोनस्टासला पहिल्या सामन्यातही संघात जागा मिळाली नव्हती. या सामन्यात उस्मान ख्वाजा आणि ट्रेव्हिस हेड यांनी ओपनिंग केली होती. सॅम कोनस्टास घरी परतल्यानंतर त्याने आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सॅम कोनस्टासने कोड स्पोर्टशी बोलताना सांगितलं की, ‘मला आनंद आहे की मी संघाचा भाग होतो. या संघात स्टीव्ह स्मिथ, ट्रेव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजासारखे एकापेक्षा एक सरस खेळाडू होते. ते कोणत्याही परिस्थितीत खेळू शकतात. त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळाला.’ असं सांगितल्यानंतर कोनस्टासने घरी का पाठवलं? ते देखील सांगितलं.

‘मला माहिती आहे की मला घरी का पाठवलं गेलं आहे. मी अजूनही शिकत आहेत. पण भविष्यात जेव्हा मला कधी कसोटी खेळण्याची संधी मिळेल तेव्हा त्या संधीचं सोनं करेन. मला माहिती आहे ट्रेव्हिस हेडला ओपनिंग करण्याची जबाबदारी का मिळाली. कारण तो एक महान खेळाडू आहे. तसेच फलंदाजी करताना तो गोलंदाजांवर दबाव ठेवतो.’, असं सॅम कोनस्टास याने सांगितलं.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी सॅम कोनस्टासची मायदेशी रवानगी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियात फर्स्ट क्रिकेट ट्रॉफी शेफील्ड शील्ड सुरु आहे. या स्पर्धेत न्यू साऊथ वेल्स संघाकडून मैदानात उतरणार आहे. क्वींसलँडविरुद्धच्या सामन्यात सॅम कोनस्टास खेळण्याची संधी मिळणार आहे. हा साना ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. कोनस्टासने डिसेंबर 2024 मध्ये कसोटीत पदार्पण केलं होतं. पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकलं होतं. तसेच जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.