कॉमेडियन प्रणित अधिक प्राणघातक हल्ला: सोलापुरात मारहाण झाल्यानंतर कॉमेडीयन प्रणित मोरेने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी ज्यांनी या प्रकरणी मोलाची साथ दिली त्या सर्वांचे मनापासून आभार मानले आहेत. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. मात्र, अद्याप मुख्य आरोपी फरार आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही पोलिसांनी जप्त केल आहे, ते फुटेज देण्यात यावेत, अशी मागणी कॉमेडीयन प्रणित मोरेने केली आहे. सुशीलकुमार शिंदेचे नातू, अभिनेता वीर पहारिया बाबतीत प्रणित मोरेने विनोद केल्याने प्रणित मोरेला मारहाण करण्यात आली होती.
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेला सोलापुरात मारहाण करण्यात आली आहे. सोलापुरातील एका कार्यक्रमात स्काय फोर्स फेम अभिनेता वीर पाहाडियावर (Veer Paharia) जोक केल्यामुळे दहा ते बारा जणांच्या गटानं हल्ला केल्याची माहिती स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेनं आपल्या सोशल मीडिया (Social Media) हँडलवर पोस्ट करुन दिली. तसेच, याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याची माहितीही प्रणित मोरेनं आपल्या पोस्टमधून दिली होती. अशातच आता याप्रकरणाची पोलिसांनी दखल घेतली असून 10 ते 12 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू, अभिनेता वीर पहाडिया याला लक्ष्य करून स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे यांनं सोलापुरातील एका कार्यक्रमात जोक केला. त्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित असलेला एक गट नाराज झाला. त्यातून मारहाणीचा प्रकार घडला. या बाबतीत कॉमेडीयन प्रणित मोरे यानं इंस्टाग्रामवरून पोस्ट करतं माहिती दिली होती, तर वीर पहाडियानं देखील दिलगिरी व्यक्त केली होती. या संपूर्ण प्रकरणानंतर आरोपी तन्वीर शेख आणि त्याच्या अन्य 10-12 साथीदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरून सोलापूरच्या सदर बाजार पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 189(2), 190, 191(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक पाहा..