Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून भारतात आहे. प्रियांका तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी भारतात आली आहे. सिद्धार्थ आणि नीलम उपाध्यायच्या लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात प्रियांका चोप्राने तिच्या स्टाईल सेन्सने चाहत्यांची मने जिंकली. सिद्धार्थ आणि नीलम यांचे लग्न ७ फेब्रुवारी रोजी म्हणजे काल झाले. यावेळी लग्नात अनेक खास पाहुणे उपस्थित होते. पण या सगळ्यामध्ये प्रियांका चोप्राच्या नेकलेसची आता खूप चर्चा होत आहे.
नेकलेसची किंमत ऐकून व्हाल थक्क
ने भाऊ सिद्धार्थच्या मेहंदीसाठी बल्गेरी नेकलेस घातला होता. विशेषतः जेव्हा चाहत्यांनी तिच्या नेकलेसकडे पाहिले तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. आता इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिले आहे की प्रियांका चोप्राने तिच्या भावाच्या मेहंदी समारंभात घातलेला हार १०-१२ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.तसेच, मेहंदी समारंभासाठी प्रियांकाने राहुल मिश्राने डिझाइन केलेला कस्टम कॉर्सेट लेहेंगा घातला होता.
लग्नाला कोण कोण उपस्थित होते?
नीलम आणि सिद्धार्थ यांचे लग्न ७ फेब्रुवारी रोजी झाले. या लग्नात प्रियांकाचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. प्रियांका तिची मुलगी मालती मेरीसोबत लग्नाला आली होती. नंतर, निक जोनास, त्याचे पालक पॉल जोनास सीनियर आणि डेनिस मिलर जोनास देखील लग्नासाठी आले. प्रियांकाची चुलत बहीण तिचा पती राघव चड्ढासोबत लग्नाला उपस्थित होती. लग्नात मन्नारा चोप्रा देखील दिसली.
फॅशन वेबसाइट डायट सब्यानुसार, प्रियांकाने परिधान केलेल्या बल्गेरी नेकलेसमध्ये ७ पेर फळाच्या आकाराचे मॉर्गनाइट्स, ६ कुशन-कट मँडरीन गार्नेट आणि ९ कॅबोचॉन अॅमेथिस्ट होते. मेहंदीपूर्वी प्रियांकाने तिच्या भावाच्या हळदी समारंभातही धमाल केली. लग्नाच्या एक दिवस आधी झालेल्या संगीत समारंभात प्रियांकाने तिच्या कुटुंब आणि मित्रांसोबत खूप नाच केला.
विशेष म्हणजे प्रियंकाने भाऊ सिद्धार्थच्या लग्नात घातलेल्या हाताची देखील विशेष चर्चा सुरु आहे. या हिऱ्यांच्या हारात ७१.२४ कॅरेटचे हिरे आणि ६२ पाचूचे मणी आहेत जे एकूण १३०.७७ कॅरेट आहेत, यामुळे हा हार आणखी उठून दिसतो.