दिल्ली निवडणूक 2025 निकालः दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत दिल्लीकरांनी भाजपच्या पारड्यात मतांचं भरभरून दान टाकलं आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळी स्पष्ट बहुमत मिळालेल्या आप पक्षाला यावेळी दिल्लीकरांनी ठेंगा दाखवला आहे. भाजप आता या ठिकाणी एकहाती सत्ता स्थापन करणार आहे.
दिल्लीच्या विधानसभा निडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवलं आहे. एकूण 70 जागांपैकी भाजपाला एकूण 48 जागा मिळाल्या आहेत. तर आम आदमी पार्टीला फक्त 22 जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे कधीकाळी सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही.
यावेळच्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने भाजपवर विश्वास ठेवला आहे. भाजपला येथे एकूण 45.56 टक्के मते मिळाली आहेत. तर आम आदमी पार्टीला येथे 43.57 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसला एकूण 6.34 टक्के मते मिळाली आहेत. जयदू पक्षाला एकूण 1.06 टक्के मते मिळाली आहेत. बसपाला 0.58 टक्के, सीपीआयला 0.02 टक्के, एलजेपीएआरव्ही पक्षाला 0.53 टक्के, एनसीपीला 0.06 टक्के, मते मिळाीली आहेत. नोटाला येथे 0.57 टक्के मते मिळाली आहेत.
दिल्लीच्या जनेतेने दिलेला हा कौल माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मान्य केला आहे. आम्ही पुढच्या काळात एक समक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करू, असं त्यांनी म्हटलंय. तसेच आप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कठीण काळात पक्षाचा प्रचार केला, त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या निकालानंतर दिल्लीकरांचे आभार मानले. तसेच आगामी काळात आम्ही दिल्लीच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
दरम्यान, या निकालानंतर आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. सत्ताबदलानंतर नायब राज्यपालांनी एक आदेश काढला आहे. या आदेशाअंतर्गत मंत्रालयातून एकही कागद बाहेर जाता कामा नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
अधिक पाहा..