Beed Accident : कारच्या अपघातात दोन डॉक्टर ठार; तर दुसरे डॉक्टर नवदाम्पत्य गंभीर जखमी
esakal February 09, 2025 01:45 AM

बीड - लग्नानंतर देवदर्शनाला जावून परतणाऱ्या कुटूंबाच्या कारला अपघात होऊन दोन डॉक्टर ठार तर डॉक्टर नवदाम्पत्य गंभीर जखमी झाल्याची घटना मध्यरात्री अहिल्यानगर - अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील मुळुकवाडी येथे घडली. अपघातग्रस्त कारचा चुराडा झाला असून चाकेही निखळून पडली आहे.

डॉ. मृणाली भास्कर शिंदे व डॉ. ओमकार ज्ञानोबा चव्हाण अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर, डॉ. मंथन चव्हाण व डॉ. ऐश्वर्या चव्हाण हे नवदाम्पत्य गंभीर जखमी आहे. अपघातग्रस्त कुटूंब वझुर (ता. मानवत, जि. परभणी) येथील आहे. जखमींवर छ. संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

डॉ. मंथन चव्हाण व डॉ. ऐश्वर्या चव्हाण यांचा ता. चार फे्रबुवारीला विवाह झाला. त्यानंतर या दोघांसह डॉ. ओमकार चव्हाण व त्यांची चुलत बहिण डॉ. मृणाली शिंदे असे चौघेजण कारने देवदर्शनासाठी तुळजापूर, पंढरपूर व जेजूरीला गेले. जेजुरी येथून देवदर्शन उरकूर हे कुटूंब कारने (्रकमांक एम. एच २२ ए. एम ४५७१) अहिल्यानगर - अहमदपूर राष्ट्रीय महामार्गाने वझूर (ता. मानवत) गावाकडे परतत होते.

पाटोदा ते मांजरसुंबानजीक मुळूकवाडीजवळ त्यांची कार एका पुलाच्या कठड्याला धडकली. आदळली. यात कारच्या पुढच्या भागाचा पुर्ण चुराडा झाला व कारचे पुढचे दोन्ही चाके निखळून पडली. यात डॉ. मृणाली शिंदे व डॉ. ओमकार चव्हाण ठार झाले. तर, डॉ. ऐश्वर्या व डॉ. मंथन हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर संभाजीनगरला उपचार सुरु आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.