दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. दिल्लीमध्ये काँग्रेसचा दारुन पराभव झाला. दिल्लीमध्ये सत्ताधारी आप, मुख्य विरोधी पक्ष भाजप यांच्यात मुख्य लढत होती. परंतु निवडणुकीत काँग्रेस स्थिती पाहून अभिनेता आणि माजी खासदारयांनी राहूल गांधींवर टीका केली आहे.
दिल्ली निवडणुकीत काँग्रेसची अवस्था पाहून बॉलिवूड अभिनेता आणि माजी खासदार परेश रावल यांनी राहूल गांधींना टोला लगावला आहे. परेश रावल यांनी एक्स अकाऊंटवर एक ट्विट केलं आहे. एका युजरने राहूल गांधीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्यांनी '100th Successful failure.. या ऐतिहासिक प्रवासाचा भाग झाल्याबद्दल शुभेच्छा' दिल्या होत्या. त्या ट्विटला प्रतिक्रिया देत यांनी राहूल गांधींना टोला लगावला आहे.
ते म्हणाले की, 'एका आईचं दु:ख समजून घ्या... ना बहू मिलती है और ना ही बहुमत मिलता है' असं म्हणत त्यांनी राहूल गांधींना टोला लगावला आहे. तसंच त्यांनी एक ट्वीट शेअर करत दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली आहे.
काँग्रेस आणि केजरीवाल यांचा दारून पराभव झाला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर काँग्रेस आणि केजरीवाल यांच्यावर मीम्स सुद्धा व्हायरल होत आहेत. नेटकरी राहूल गांधी आणि केजरीवाल याच्या पराभवामुळे ट्विट करत मीम्स शेअर करत आहेत.