Maharashtra Political News Live : दोन तासांपासून पिछाडीवर असलेले अरविंद केजरीवालांना 254 मतांची आघाडी
Sarkarnama February 09, 2025 05:45 AM
Delhi Vidhan Sabha result 2025 live : दोन तासांपासून पिछाडीवर असलेले अरविंद केजरीवालांना 254 मतांची आघाडी

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणीत गेल्या दोन तासांपासून पिछाडीवर असलेले माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आता आघाडीवर आले आहे. त्यांना 254 मतांची आघाडी मिळाली आहे. मनीष सिसोदिया यांनी देखील आघाडी घेतली आहे.

Shirdi News : शिर्डीतील साईसंस्थानच्या प्रसादालयातील भोजनार्थींच्या संख्येत घट

साईबाबा संस्थानच्या भोजनालयात भाविकांव्यतिरिक्त इतरांना मोफत जेवण बंद केल्यानंतरच्या गुरुवारी भोजनार्थींच्या संख्येत जवळपास दहा हजारांची घट झाल्याचे आढळले. गुरुवारी मोफत भोजन प्रसादाची 38 हजार 500 भाविकांनी टोकन वाटप केली. ज्यापैकी 24 हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला. तर, सशुल्क पासद्वारे 4 हजार जणांनी प्रसादाचा लाभ घेतला.

Delhi Assembly result 2025 live : दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री होणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्राथमिक कलांनुसार भाजपने जोरदार मुसंडी घेतली असून, 42 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी कायम ठेवल्यास दिल्लीत भाजपचा 1993 नंतर मुख्यमंत्री होईल. तब्बल 27 वर्षांनंतर भाजपचा दिल्लीच्या तख्तावर मुख्यमंत्री बसू शकतो.

Delhi Results 2025 : काँग्रेस दिल्लीत एकमेव जागेवर आघाडीवर; दिग्गज नेते पिछाडीवर

काँग्रेसच्या अलका लांबा आणि संदीप दीक्षित पिछाडीवर आहेत. बादली या एकमेव मतदारसंघातून काँग्रेस आघाडीवर आहे.

Delhi Election 2025 Results : भाजपची दिल्ली विधानसभेत जोरदार मुसंडी, 41 जागांवर आघाडीवर

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी घेतली असून, भाजपने कलांनुसार 41 जागांवर आघाडी घेतली आहे. आम आदमी पक्ष 27 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडी घेतली आहे.

Delhi Assembly Election 2025 Results : 'आप'चे केजरीवाल, आतिशी अन् सिसोदिया हे तीन दिग्गज नेते पिछाडीवर

दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, भाजपने ३१ जागांवर आघाडीवर आहे. आपचे दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. अरविंद केजरीवाल, आतिशी, मनीष सिसोदिया हे पिछाडीवर आहेत.

Delhi Assembly Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा आज निकाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. त्याचा निकाल आज लागणार आहे. त्यामुळे दिल्लीत सत्ता कोणाची याचा फैसला आज होणार आहे.

Guillain Barre Syndrome case : पुण्यात GBS च्या रूग्णांची संख्या 180 वर

पुण्यातील GBS रूग्णांची संख्या 180 वर पोहचली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात जीबीएसचे रूग्ण वाढत आहेत. दूषित पाण्यामुळे जीबीएसचा आजार फोफावत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झालं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.