आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आऊट ऑफ फॉर्म आहे. त्यामुळे टीम इंडियाची चिंता वाढली आहे. रोहितला गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. रोहितला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. रोहितला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे रोहितच्या स्थानावरूनही आता चर्चा होच आहे. या दरम्यान रोहित शर्माबाबत मोठा दावा केला जात आहे, ज्यामुळे क्रिकेट चाहत्यांची चिंता वाढू शकते.
रोहितला हेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत धावा करता आल्या नाहीत. रोहित कर्णधार म्हणूनही अपयशी ठरला. त्यानतंर रोहित निवृत्त होणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र स्वत: रोहितने आपण खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर थेट नागपुरात इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. रोहित इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही ढेर झाला. रोहितने नागपुरात झालेल्या या सामन्यात 7 बॉलमध्ये फक्त 2 धावा केल्या आणि आऊट झाला. रोहित उर्वरित 2 सामन्यातही अपयशी ठरला तर तो स्वत: चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेईल, असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान रोहितसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने इंग्लंडविरुद्धचे 2 एकदिवसीय सामने हे निर्णायक असणार आहेत. या दोन्ही सामन्यात दमदार कामगिरी करुन चॅम्पियन्स ट्रॉफीआधी कमबॅक करण्याची संधी रोहितकडे आहे. रोहितने मोठी खेळी करावी, अशी आशा चाहत्यांना आहे. त्यामुळे रोहितसाठी हे 2 सामने फार महत्त्वाचे आहेत.
रोहित 2 सामन्यात धावा करणयात अपयशी ठरल्यास तो मोठा निर्णय घेऊ शकतो. रोहित बाहेर झाल्यास हार्दिक पंड्या याला कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. शुबमन गिल हा टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. मात्र हार्दिककडे शुबमनच्या तुलनेत नेतृत्वाचा दांडगा अनुभव आहे.