Cotton storage Bag Scam : ‘कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती Dhananjay Munde यांना आधीच दिली होती’
कापूस साठवणूक बॅगेत घोटाळा झाल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली होती,. आता घोटाळ्याची तक्रार देणारे पुरुषोत्तम हिरुडकर मोठा खुलासा केलाय. कापूस साठवणूक बॅग घोटाळ्याची माहिती तत्कालीन कृषीमंत्री आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याचं तक्रारदार पुरुषोत्तम हिरुडकर यांनी सांगितलं.. कापूस साठवणूक बॅगा दुप्पटी पेक्षा जास्त किमतीनं खरेदी केल्या असून त्यांचा दर्जाही अत्यंत निकृष्ट असल्याची लेखी तक्रार त्यांनी केली.. मात्र कृषी विभागानं त्याकडे दुर्लक्ष केलं.. शिवाय कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी कापूस साठवणूक बॅगेसंदर्भातली निविदा काढताना ती निविदा “फॉर्मेशन ऑफ पॅनल्स” या मथळ्याखाली काढली होती…त्यामुळे त्याच्याचं लोकांना कंत्राट मिळाल्याचा आरोपही त्यांनी केलाय.