प्रत्येक शेअरवर मिळणार ९ रुपये लाभांश, डिसेंबर तिमाहीत निव्वळ नफ्यात ५२ टक्के वाढ
ET Marathi February 12, 2025 01:45 PM
मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझने १० फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल देखील जाहीर केले आहेत. यासोबतच कंपनीने लाभांशही जाहीर केला आहे. अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझने भागधारकांसाठी ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ९ रुपये लाभांश मंजूर केला आहे. शेअर्स घसरलादरम्यान, सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाली आणि बीएसईवर हा शेअर ६७६६ रुपयांवर बंद झाला. तर मंगळवारी शेअर्स घसरून ६,३०९.९० रुपयांवर आला. कंपनीचे मार्केट कॅप ९७,२८४ कोटी रुपये आहे. तिमाही निकालडिसेंबर तिमाहीत अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर ५१.८ टक्क्यांनी वाढून ३७२.३ कोटी रुपयांवर पोहोचला. अपोलो हॉस्पिटल्सने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले की, तिसऱ्या तिमाहीत महसूल ५,५२७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ४,८५१ कोटी रुपयांचा होता. कंपनीने सांगितले की, आर्थिक वर्ष २०२६ पासून पुढील ३-४ वर्षांत ११ ठिकाणी ३,५१२ नवीन बेड जोडण्याची त्यांची योजना आहे. आरोग्यसेवा मूलभूत अधिकारअपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझचे अध्यक्ष प्रताप सी रेड्डी म्हणाले, निकाल आमच्या विकासाच्या कथेचे प्रतिबिंब आहेत, जे भारताला निरोगी बनवण्याचे आणि एक अब्जाहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे ध्येय प्रतिबिंबित करते. मुंबई ते वाराणसी आणि चेन्नई ते गुरुग्रामपर्यंत दर्जेदार आरोग्यसेवा हा एक विशेषाधिकार नसून सर्वांसाठी मूलभूत अधिकार आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.