धूळ, प्रदूषण, खाण्याच्या वाईट सवयी, ताणतणाव आणि वाईट जीवनशैली यासारख्या अनेक कारणांमुळे चेहऱ्यावर डाग, मुरुम यांच्या सारख्या समस्या उद्भवतात. चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरूम सारख्या समस्या झाल्यामुळे तुमचं सौंदर्य खराब होऊ शकते. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हजारो रूपये खर्च केले जातात. परंतु मार्केटमधील क्रिम्समध्ये भरपूर प्रमाणात रसायनिक केले जातात. क्रिम्समधील रसायनिक पदार्थांमुळे तुमची त्वचा खराब होऊ शकते. त्यामुळे अनेकजण घरच्या घरी काही उपाय करून त्वचा चमकदार आणि निरोगी करू शकता.
पिंपल्ससारख्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय केल्यास फायदे होतील. तुमच्या स्वयंपाकघरातील हा एक पदार्थ तुमच्या त्वचेचं आरोग्य निरोगी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील. तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार बनवण्यासाठी तुरटी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी तुरटीचा वापर फायदेशीर ठरू शकतो. चला तर जाणून घेऊया घरच्या घरी तुरटीच्या मदतीनं चमकदार त्वा कशी मिळवायची.
तुरटी पोटॅशियम आणि अॅल्युमिनियम सल्फेटपासून बनलेला एक नैसर्गिक खनिज आहे. तुरटीमध्ये अँटीसेप्टिक, अँटीबॅक्टेरियल आणि तुरट गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या आरोग्यासह त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तुरटीचा वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. तुरटीचा तुमच्या चेहऱ्यावर वापर केल्यामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्र साफ होण्यास मदत होते. तुरटीचा चेहऱ्यावर वापर केल्यामुळे त्यावरील तेल नियंत्रित राहाण्यास मदत होते आणि चेहऱ्यावरील बॅक्टिरियांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय, तुरटी तुमच्या चेहऱ्यावर वापरल्यामुळे त्वचेची जळजळ कमी होण्यास मदत होते आणि त्यावरील डाग हलके होण्यास मदत होते. तुरटी तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यास मदत होते आणि चेहरा चमकदार होतो. तुरटीचा वापर केल्यामुळे तुमची त्वचा घट्ट होण्यास मदत होते आणि त्यावरील पिंपल्स दूर होतात. तुरटीमधील दाहक-विरोधी गुणधर्म चेहऱ्यावरील लालसरपणा दूर होण्यास मदत होते.
तुरटीचा चेहऱ्यावर वापर करताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. तुम्ही तुरटीचा वापर करण्यासाठी तुरटीचे तुकडे पाण्यामध्ये मिसळा आणि स्वच्छ बाटलीमध्ये भरून ठेवा. बाटलीमधील पाणी तुम्ही तुमचा चेहरा धुण्यासाठी वापरू शकता. तुरटीची पावडर करून तुम्ही त्यामध्ये गुलाबपाणी किंवा मध मिसळू शकता. तुरटीची ही पेस्ट 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावल्यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होते. चेहऱ्यावरील पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीच्या टोनरचा वापर करू शकता. तुरटी पावडरमध्ये चंदन पावडर मिसळून तुमच्या चेहऱ्यावर हा स्क्रब लावल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र साफ होण्यास मदत होते आणि त्वचा घट्ट होण्यास मदत होते. चंदन पावडर आणि तुरटी पावडर एकत्र वापरल्यामुळे चेहरा चमकदार होण्यास मदत होते. तुरटी चेहऱ्यावर वापरताना, डोळ्यांभोवती लावू नका. जर त्वचा संवेदनशील असेल तर तुरटी वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. तुरटीचा जास्त वापर केल्याने त्वचा कोरडी होऊ शकते, म्हणून त्याचा नियमित वापर करा.