PM Modi News : पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ल्याची धमकी; मुंबई कनेक्शन आलं समोर
Saam TV February 12, 2025 07:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानावर हल्ला होण्याची धमकी पोलिसांना मिळाली होती. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा फोन आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ सूत्रे हालवत चेंबूर परिसरातून एका संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. संशयीत आरोपीची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यावेळी विमानावर हल्ला करण्यात येणार आहे, असा एका फोन मुंबई पोलिसांना आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून सुरक्षा एजन्सीला अलर्ट करण्यात आले होते. त्यानंतर तात्काळ फोन कऱणाऱ्याचा शोध सुरू केला. पोलिसांना हा फोन चेंबूरमधून करण्यात आल्याचे समजले. पोलिसांनी येथून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलेय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत, त्यानंतर ते अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्याआधी दहशतवादी हल्ल्याची धमकी पोलिसांना मिळाली. ११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये एका अज्ञात व्यक्तीने फोन करत दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे सांगितले होते. त्यानंतर पोलिसांकडून तात्काळ सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देत तपास सुरू कऱण्यात आला होता.

पंतप्रधान मोदींवर दहशतवादी हल्ल्याचं प्रकरण गांभिर्याने घेत पोलिसांनी इतर सुरक्षा एजन्सीला माहिती देत तपास सुरू केला. पोलिसांनी याबाबत सांगितले की, ज्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये फोन केला तो धमकीचा होता. त्याला चेंबूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. तो व्यक्ती मानसिक आजारी असल्याचे समजतेय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.