IND vs ENG Playing XI : बुमराहच्या रिप्लेसमेंटला दिली संधी, शमीला विश्रांती, भारतीय संघात तीन बदल; इंग्लंडने जिंकला टॉस
esakal February 12, 2025 07:45 PM

IND vs ENG 3rd ODI Playing XI and Toss: भारताने इंग्लंडविरूद्धच्या तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली आहे. आज दरम्यान अहमदाबाद येथे अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी भारतीय संंघात तीन महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी व वरूण चक्रवर्थीच्या जागी संघात अर्शदीप सिंगला, वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यागदवला संधी देण्यात आली आहे. सामन्याचा नाणेफेक इंग्लंडने जिंकला असून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

ही मालिका आगामी स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची समजली जात आहे. कारण या मालिकेनंतर भारतीय संघ थेट चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या मालिकेकडे सराव मालिका म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे त्यामुळे अंतिम सामन्याच्या प्लेईंगल इलेव्हनमध्ये केलेला हा बदल महत्त्वाचे ठरणार आहे. कारण मालिकेतील कामगिरीवर चॅम्पियन्स ट्रॉफीतील अंतिम ११ खेळाडूंची निवड होईल.

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाला एक मोठा धक्का मिळाला. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला मुकणार आहे. त्यामुळे आता अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी व हर्षित राणा या वेगवान गोलंदाजांचे कौशल्य पणाला लागले आहे.

अंतिम सामन्यासाठी मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली असून भारतीय संघ आज नवख्या अर्शदीप सिंगला आजमावून पाहणार आहे. त्याचबरोबर मागच्या दोन सामन्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या अष्टपैलू रविंद्र जडेजाच्या जागी आज वॉशिंग्टन सुंदर खेळणार आहे. तर दुपाखतग्रस्त वरूण चक्रवर्थीच्या जागी आज कुलदीप यादव मैदानात उतरला आहे.

इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडेसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल(यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि

अंतिम सामन्यासाठी इग्लंडच्या संघात फक्त एक बदल करण्यात आला असून आज जेमी ओव्हरटनच्या जागी टॉम बॅंटन संघात खेळणार आहे.

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन -

फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, टॉम बॅंटन, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वुड, साकिब महमूद

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.