बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) कायम त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. सध्या अर्जुन आपल्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. अर्जुन कपूर आता 'मेरे हसबंड की बीवी' (Mere Husband Ki Biwi ) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.
'मेरे की बीवी' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यात अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये कपूरचे वैतागलेले रूप पाहायला मिळत आहे. चाहत्याच्या एका कृतीमुळे अर्जुन खूप वैतागलेला पाहायला मिळाला.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये अर्जुन, भूमी आणि रकुल 'मेरे हसबंड की बीवी' चे प्रमोशन करताना पाहायला मिळत आहे. तेव्हा कलाकारांना विचारले जाते की, "तुम्हाला तुम्हाला हा चित्रपट का आवडतो?" तेव्हा भूमी उत्तर देत असताना एक चाहता मोठ्या आवाजात '' अशा हाक मारतो. यावर प्रतिक्रिया देत अर्जुन कपूर वैतागतो आणि एकटक त्या चाहत्याकडे पाहतो आणि फक्त मान हलवताना दिसत आहे.
अर्जुनचा हा प्रतिक्रियेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याआधी देखील चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अर्जुनला मलायकावरून बोलण्यात आले होते. 2024 मध्ये दिवाळीतच अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबत ब्रेकअप झाल्याचे सांगितले होते. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांना अनेक वेळा वयामुळे ट्रोल देखील करण्यात आले होते.