बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे
२३ ला एकपात्री अभिनय स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः शहराजवळील बसणी पंचक्रोशी ग्रंथालयातर्फे श्रीधर कृष्णा पेटकर स्मृती एकपात्री अभिनय स्पर्धा २३ फेब्रुवारी सकाळी १० वाजता बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या सभागृहात आयोजित केली आहे. ही स्पर्धा रत्नागिरी तालुका मर्यादित आहे.
अभिनय स्पर्धेत पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. स्पर्धक विद्यार्थ्यांना कोणत्याही नाटकातील एकांकिकेतील अथवा स्वलिखित उताऱ्यातील भाग सादर करता येईल. सादरीकरणासाठी जास्तीत जास्त सात मिनिटे वेळ देण्यात येईल. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकासाठी दीड हजार, द्वितीय १ हजार ३०० व तृतीय क्रमांकास १ हजार १०० तर उत्तेजनार्थ दोन क्रमांकासाठी ५०० रुपये रोख व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील. ही स्पर्धा सुहास पेटकर यांनी प्रायोजित केली असून अधिक माहितीसाठी श्रीनिवास जोशी, तसेच श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे ग्रंथालयातर्फे आवाहन करण्यात आले आहे.