दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर शालीमार बाग मतदार संघातून विजयी.
आमदार रेखा गुप्ता आता दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.
रेखा गुप्ता यांनी संपूर्ण शिक्षण दिल्लीत पूर्ण केले आणि एलएलबी पदवी मिळवलेली आहे.
भाजपने जर एखाद्या महिलेला दिल्लीचे मुख्यमंत्री बनवायचे ठरवले तर रेखा गुप्ता यांचा दावा खूप मजबूत आहे.
रेखा गुप्ता यांचा जन्म १९७४ मध्ये जिंद जिल्ह्यातील जुलाना उपविभागातील नंदगड गावात झाला.
शिक्षण घेत असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील आणि पुढे राजकारणात पदार्पण.
रेखा गुप्ता या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही निगडीत आहेत.
रेखा गुप्ता भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिलेल्या आहेत.
एकूणच आमदार रेखा गुप्ता यांचे प्रोफाईल हे महिला मुख्यमंत्रिपदासाठी तगडे मानले जात आहे.