Marathi Literature : संमेलनात ७० प्रकाशकांचा सहभाग; पुस्तकांच्या विक्रीसाठी १०६ स्टॉल, उद्यापासून सारस्वतांचा मेळा
esakal February 20, 2025 02:45 PM

नवी दिल्ली : सरहद संस्थेच्या वतीने आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी राजधानी दिल्ली सज्ज झाली आहे. २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या संमेलनात ७० हून अधिक नामांकित प्रकाशक संस्था सहभागी होत आहे.

तसेच देशातील विविध शासकीय, अशासकीय तसेच खासगी वितरक संस्थांचे एकूण १०६ स्टॉल असतील. या निमित्त दिल्लीत मराठी साहित्याचा गजर होणार आहे. अमळनेर येथे गेल्या वर्षी नझालेल्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पुस्तकांची फारशी विक्री न झाल्याने अनेक प्रकाशन संस्थांचे भाडेही वसूल झाले नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

याची दखल घेत प्रकाशकांना भेडसावलेल्या अडचणी आणि समस्यांची दखल घेत अखिल भारतीय साहित्य महामंडळ आणि सरहद संस्थेने पुस्तक तसेच अन्य साहित्य विक्रीच्या स्टॉलबाबत नियोजन केले आहे. प्रत्येक स्टॉलच्या प्रतिनिधींना दिल्लीत राहण्यासह इतरही पान ५ वर सवलती देण्यात आल्याने केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून अनेक प्रकाशक संस्थांनी या संमेलनात स्टॉल उभारले आहेत.

त्यामुळे संमेलन राज्याबाहेर असूनही स्टॉलची संख्या वाढली आहे. यंदा पुस्तक विक्रीला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे या संमेलनात अनेक नामवंत साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशनही होणार असल्याचे सांगण्यात आले.

दिल्लीतील संमेलनात नामांकित प्रकाशन संस्थांमध्ये मराठी प्रकाशकांची संख्या लक्षणीय आहे. स्टॉलसाठी यंदा माफक भाडे आकारले आहे. स्टॉलबरोबर असलेल्या एका व्यक्तीची निवासाची सोयही केली आहे. तसेच अन्य सेवा-सुविधाही उपलब्ध केल्या आहेत.

- राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय प्रकाशक संघ

दिल्लीत ७१ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यानिमित्त दिल्लीकरांना मराठी साहित्य, ग्रंथसंपदा खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या संमेलनात विविध कार्यक्रमांसह पुस्तक विक्रीला दिल्लीकरांसह मराठी साहित्यप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.

- प्रा. उषा तांबे, अध्यक्षा, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.