Chhaava Box Office Collection : विकीच्या 'छावा'ने 'पुष्पा 2'ला टाकले मागे, ६ दिवसांत २०० कोटींचा टप्पा पार
Saam TV February 20, 2025 02:45 PM

विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava) चित्रपटाने अवघ्या 6 दिवसात बॉक्स ऑफिस गाजवले आहे. चित्रपटाने तब्बल 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रेक्षकांमध्ये 'छावा'ची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. हा सुपरहिट चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि महाराणी येसूबाईची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पाहायला मिळत आहेत.

'छावा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 6
  • '' पहिला दिवस - 33.1 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 197.75 कोटी रुपये

आतापर्यंत कोणत्या चित्रपटांनी २०० कोटींचा टप्पा पार केला?
  • '2'- 3 दिवसात 200 कोटींचा टप्पा पार

  • जवान, अॅनिमल, पठान- 4 दिवसात 200 कोटींची कमाई

  • गदर 2, स्त्री - 25 दिवसात 200 कोटी

  • '2' - 6 दिवसात 200 कोटी

'छावा' 300 कोटींची घोडदौड सुरू

'छावा' चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कमाई करत आहे. या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसात 200 कोटींचा टप्पा पार केला आहे. आता या चित्रपटाची 300 कोटींची घोडदौड सुरू झाली आहे. विकी कौशलचा 'छावा' अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करत आहे.

'छावा' चित्रपट तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. 'छावा' चित्रपटाने चार दिवसांत सिनेमाचे बजेट वसूल केले आहे. चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहायला मिळत आहे. छावा' चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 5 कोटी कमावले होते. 'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.