Arijit Singh: लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अरिजित सिंगला आला वडिलांचा फोन; घडलेला तो प्रकार पाहून चाहते झाले भावुक
Saam TV February 21, 2025 03:45 AM

Arijit Singh: बॉलिवूडचा दिग्गज पार्श्वगायक अरिजित सिंग त्याच्या मधुर आवाजासाठी आणि रोमँटिक गाण्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. पण याशिवाय आणखी एक गोष्ट आहे जी अरिजीतला खास बनवते. ते म्हणजे त्याचा सध्या स्वभाव आहे. अरिजीत अनेकदा त्याच्या गावी स्कूटर चालवताना किंवा घरातील वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर जाताना दिसतो.

अरिजीत सिंगचा हा व्हिडिओ व्हायरल झाला

चा हाच स्वभाव त्याच्या अलीकडील संगीत कार्यक्रमातही दिसून आला. गेल्या रविवारी अरिजीतचा चंदीगडमध्ये एक संगीत कार्यक्रम होता. अरिजीत मोठ्या गर्दीसमोर गाणे गात असताना त्याच्या वडिलांच्या व्हिडिओ कॉल आला. या कॉन्सर्ट दरम्यान त्याने त्याच्या बाबांचा कोळ उचलून सर्वांचे मन जिंकले. हा व्हिडिओ काही मिनिटांतच वर व्हायरल झाला आणि लोक गायकाचे कौतुक करताना दिसत आहेत. इंस्टाग्रामवरील एका सोशल मीडिया पेजने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, यामध्ये अरिजीत कॉन्सर्ट दरम्यान त्याच्या वडिलांचा फोन घेतो.

संगीत कार्यक्रमादरम्यान वडिलांचा फोन आला

यावेळी अरिजित सिंग 'लपता लेडीज' चित्रपटातील 'ओ सजनी रे' या गाण्यावर परफॉर्म करत होते. यादरम्यान, जेव्हा त्याने फोन उचलला आणि त्याच्या स्क्रीनकडे पाहत हात हलवला तेव्हा लोक थोडे गोंधळले. पण मग त्याने फोनची स्क्रीन प्रेक्षकांकडे वळवली आणि फोनच्या स्क्रीनवर एक माणूस दिसला, लोकांना प्रकरण काय आहे हे समजण्यास वेळ लागला नाही. अरिजित सिंग काही वेळ स्क्रीनकडे पाहत राहिला पण त्याने गाणे थांबवले नाही. पण नंतर कॉल डिस्कनेक्ट केल्यानंतर त्याने प्रेक्षकांना सांगितले की व्हिडिओ कॉलवर माझे वडील होते.

चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव केला

अरिजीत सिंगच्या या विधानाने चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आणि त्याचे चाहते कमेंट करून त्याचे कौतुक करू लागले. एकाने लिहिले, "एका वडिलांसाठी आपल्या मुलाचा अभिमान वाटण्याची ही सर्वोत्तम भावना असावी." एका फॉलोअरने कमेंट केली: तुमच्या पालकांच्या कॉलकडे कधीही दुर्लक्ष करू नका. व्हिडिओवर अशाच प्रकारच्या अनेक कमेंट आल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.