द्रुतगती मार्गावर प्रवेशासाठी अनधिकृत गेट
esakal February 21, 2025 11:45 PM

द्रुतगती मार्गावर प्रवेशासाठी अनधिकृत गेट !
अपघाताचा धोका : उर्से पेट्रोल पंपाजवळील प्रकार

सोमाटणे, ता. २१ : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से पेट्रोल पंपाजवळून अनधिकृत प्रवेश करता यावा, यासाठी महिनाभरापूर्वी अज्ञात व्यक्तींनी लोखंडी संरक्षक कुंपण तोडले आणि गेट बसवून प्रवेश मार्ग तयार केला आहे. यामुळे अपघाताची भीती आहे.
या अनधिकृत गेटचा उपयोग पाहिजे तेव्हा करता यावा, यासाठी गेटला कुलूपही बसवण्यात आले आहे. हे ठिकाण सीसीटीव्हीच्या कक्षेत येत नसल्याने रस्ते विकास महामंडळ किंवा रस्त्याची व्यवस्था पाहणाऱ्या ‘आयआरबी’ कंपनीच्याही लक्षात आले नाही. त्यामुळे हे गेट सुरूच आहे. या गेटजवळ रस्त्याला उतार आहे. तसेच टोलनाक्याचे स्थलांतर झाल्याने मुंबई-पुणे लेनवरून वाहने सुसाट जात असल्याने हे गेट धोकादायक ठरण्याची भीती आहे.
--------
द्रुतगती मार्गावर प्रवेश करण्यासाठी अधिकृत प्रवेश मार्ग आहे. कोणी अतिक्रमण करुन प्रवेश मार्ग तयार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर तत्काळ कारवाई करू.
- राकेश सोनवणे, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ

Smt21Sf1.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.